रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची गय नाही: निर्बंध मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

मुंबई, दि. 23 :- ‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचे व घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. रस्त्यांवर अकारण दिसणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करुन…

पुढील पंधरा दिवस गांभीर्याने वागण्याची गरज… आरोग्‍य यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करा- मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सूचना

 मुंबई दि. २४:  पुढील पंधरा दिवस गांभीर्याने वागण्याची गरज असून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करा, व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवतांना मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यासारख्या शहरात ताकदिने काम करा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव…

जे.जे.तील कोरोनाच्या चाचणी व उपचारासाठी तयारी पूर्ण… सामाजिक दुरी सर्वांनी पाळावी- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची ग्वाही

मुंबई, दि. 23 :  कोरोनाविरोधातील लढाईसाठी राज्य शासन सज्ज असून कोरोनाच्या तपासणी तथा उपचारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे दिली. भायखळा येथील जे.जे.  रुग्णालयात निर्माण करण्यात आलेल्या चाचणी केंद्र आणि कोरोनाबाधित रूग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी मंत्री देशमुख यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक दूरी सर्वांनी पाळण्याबाबतचे आवाहन त्यांनी यावेळी केले.             यावेळी श्री. देशमुख म्हणाले, कोरोनाविरोधातील ही लढाई जिंकण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी सज्ज असून त्यांना आवश्यक सर्व मदत शासन देईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह संपूर्ण शासनव्यवस्था खंबीर आहे. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे. भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात कोरोना अर्थात कोविद-19 या विषाणूचे चाचणी केंद्र  विक्रमी वेळेत उभे करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक सर्व यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे. त्याची दिवसाला 150 चाचण्या घेण्याची क्षमता आहे. ही क्षमता 1000 पर्यंत वाढविता येते. या चाचणी केंद्रासोबतच करोनाबाधितांसाठी 70 खाटांचे विलगीकरण कक्ष आणि 10 खाटांचे अतिदक्षता केंद्र सुरू करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून त्याची पाहणी श्री. देशमुख यांनी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर Live कडून नम्र आवाहन…

काही दिवस आपलं  रूटीन किंवा मौजमस्तीचं जगणं थांबलं तर काही बिघडत नाही.. अत्यावश्यक असेल तरंच घराबाहेर पडा! तुमचं एक चुकीचं पाऊल, एक चुकीचा निर्णय तुमच्या कुटूंबासह संबंध महाराष्ट्रासाठी घातक ठरू…

प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे पंढरपूरकरांना महत्वपूर्ण आवाहन

पंढरपूर,दि.23: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी स्वयंशिस्त पाळत प्रशासनास सहकार्य करावे. यासाठी बाहेरील देशाहून तसेच पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातून  पंढरपूरात येणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील नागरीकांनी  आपली  नोंद करावी असे…

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांचे पंढरपूरकरांना महत्वाचे आवाहन

पंढरपूर,दि.23: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी  जीवनाश्यक वस्तू विक्रीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही यांची दक्षता व्यापाऱ्यांनी व नागरीकांनी घ्यावी. तसेच गर्दी व एकमेकांपासून दूर राहण्याची  स्वयं‍शिस्त पाळा असे, आवाहन उपविभागीय…

महाराष्ट्रात संचारबंदी लागु : प्रत्येक जिल्ह्याची सीमा बंद; अत्यावश्यक सुविधा सुरू – मुख्यमंत्री ठाकरे

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी आजपासुन महाराष्ट्रात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. टॅक्सी, रिक्षा अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याची माहिती…

Lock-Down आजपासून रेल्वे, एसटी बससह खाजगी वाहतुक बंद… पुण्यात जमावबंदी

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहून राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे…

पंढरपूर मध्ये नीरव शांतता… छायाचित्रातून बघा जनता कर्फ्युला मिळालेला पंढरपूरकरांचा प्रतिसाद

   Pandharpur Live- कोरोना व्हायरसच्या संकटाला परतवण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशात 'जनता कर्प्यु' पाळला जातोय. भुवैकुंठ पंढरी नगरीतही यास 100% प्रतिसाद मिळाला. पंढरपुरकरांच्या प्रतिसादामुळे पंढरी नगरीत सर्वत्र…