👁 18 Views

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन उत्साहात साजरा

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन उत्साहात साजरा

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ सेवन व अवैध तस्करी विरोधी दिन (International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking) उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ. स्वप्नील मोरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट केले. तरुणांनी सकारात्मक जीवनशैली स्वीकारून समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे त्यांनी सांगितले. तसेच अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी जनजागृती, प्रतिबंध आणि सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.


सकाळी १० ते १०. ३० या वेळेत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संयुक्त राष्ट्र संघाने २६ जून हा दिवस अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी घोषित केला आहे.
कार्यक्रमाचे समन्वयक श्री. विशाल वाघमारे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाच्या उद्देशाविषयी माहिती दिली. यावेळी श्री. नवनाथ करांडे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देत अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. पवनकुमार शेजळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता व्यसनमुक्त भारताची शपथ घेऊन करण्यात आली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *