पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी आजपासुन महाराष्ट्रात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. टॅक्सी, रिक्षा अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे.
जमावबंदीच्या आदेशानांतर आज मुख्यामंत्र्यांनी अधिकची खबरदारी घेत संचारबंदीही लागू केली.
आज दि. 23 मार्च रोजी महाराष्ट्रातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ७५ वरुन ८९ वर गेल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली. याचबरोबर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. यात आवश्यक कारणासाठी टॅक्सी आणि रिक्षाही सुरु ठेवाण्याची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही संचारबंदी मौजमजेसाठी नाही तर स्वतःला सुरक्षित करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी असल्याचेही सांगितले.

