👁 9,717 Views

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

पर्यावरण संरक्षणसाठी घेतली सामूहिक शपथ, विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पंढरपूर येथे दि ५ जुन २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये विविध झाडांचे वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणासाठी संबोधित करण्यात आले. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एम मोरे यांनी उपस्थितांना पर्यावरणाचे महत्व विषद करून पर्यावरण बचावासाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान आवश्यक आहे असे सांगून वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले. तसेच प्रत्येकानी घरामद्धे एक तरी झाड लावावे व त्याचे संगोपनकरावे व ते इतरांना हस्तांतरित करून वृक्ष लागवडीची ही चळवळ वाढवावी असे आवाहन केले. यावेळी बी फार्मसी च्या विद्यार्थ्यानी उत्फुर्त सहभाग नोंदवत वृक्षारोपण केले. यावेळी वृक्षारोपणसोबतच पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि शाश्वत विकास याबाबत विद्यार्थ्यांना संबोधित करण्यात आले.

 श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त रोहन परिचारक यांनी उपस्थितांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देऊन वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनसाठी सर्वाना प्रेरित केले. सदरच्या कार्यक्रमाला कर्मयोगी इंजीनियरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके तसेच कर्मयोगी शिक्षण समूहातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ घेतली. सदरच्या कार्यक्रम समन्वयक म्हणून फार्मसी महाविद्यालयाचे प्रा. ए ए राऊत यांनी काम पाहिले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *