पंढरपूर : कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेतील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एकूण १३ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले असून त्यांनी प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
इयत्ता पाचवीमधून शौर्य प्रमोद शिंदे, पियुष पोपट खाडे, साईराज दिनेश अटकळे, शरयू शशिकांत सावंत, वरद एकनाथ शिंदे, ओम विकास गवळी, ऐश्वर्या विशाल डांगे , जय गणेश कोल्हे, श्रेयश शिवाजी राऊत व श्रीराज गणेश अटकळे हे विद्यार्थी पात्र ठरले.
तसेच इयत्ता आठवीमधून स्नेहल पांडुरंग क्षीरसागर , श्रेया विठ्ठल पाटील व समृद्धी संतोष पाटील यांनी यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई, रजिस्ट्रार गणेश वाळके तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

