कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे संशोधन अधिष्ठाता प्राध्यापक डॉ. अभय उत्पात यांना स्वच्छतागृहांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रेस टाइप फ्लश वॉलच्या समस्येवर विकसित केलेल्या अभिनव उपायासाठी केंद्र सरकारकडून डिझाईन पेटंट नुकतेच मंजूर झाले आहे. त्यांच्या या संशोधनामुळे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होणारी पाण्याची नासाडी रोखण्यास मदत होणार आहे.
सार्वजनिक तसेच खासगी स्वच्छतागृहांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रेस टाइप फ्लश वॉलचा वापर केल्यानंतर अनेकदा तो जाम होऊन अडकून बसतो. अशा वेळी वापरकर्ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि सतत पाणी वाहत राहिल्याने दररोज शेकडो लिटर पाणी वाया जाते. ही समस्या लक्षात घेऊन डॉ. अभय उत्पात यांनी जाम झालेला वॉल वापरकर्त्याला सहजपणे त्वरित बाहेर ओढता यावा यासाठी एक किफायतशीर व परिणामकारक उपाय विकसित केला आहे.
या अभिनव उपाययोजनेला केंद्र सरकारकडून डिझाईन पेटंटची मान्यता मिळाली असून भविष्यात हजारो लिटर पाणी वाचविण्यास या संशोधनाचा मोठा फायदा होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
या यशाबद्दल शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ.ए बी कणसे, रजिस्ट्रार गणेश वाळके, उपप्राचार्य प्रा जगदीश मुडेगावकर, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ, विभाग प्रमुख डॉ. एस एम लंबे, डॉ. एस व्ही एकलारकर, डॉ . अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले तसेच सर्व प्राध्यापक यांनी डॉ. अभय उत्पात यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

