Welcome 2021: भोग सरलं , सुख येईल….

#पडद्याआड / संकेत कुलकर्णी , पंढरपूर (साभार- दै. तरुण भारत संवाद) विकसनशील भारत सन 2020 साली विकसित देश होईल असा आशावाद गेल्या दशकापासून होता. पण, 2020 वर्षानी आपत्तीचे महाजाल देशवासिंयाना दाखवले…

Good Bye 2020 : ये जाते हुये लम्हो…

** डॉ.संजय रणदिवे 8600386896 .................................................... ये जाते हुए लम्हों,जरा ठहरो, हे बॉर्डर सिनेमातील गीत ऐकत असतानाच मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजले. खरंच हे लम्हे,हे क्षण थांबावे वाटतात का? का या क्षणांच्या…

आळंदीत भक्ती शक्ती संघाच्या वतीने निराधारांना मायेची ऊब

आळंदी : महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार, प्रवचनकार,गायक,वादक आणि वारकरी विद्यार्थी यांनी हभप पुरूषोत्तम महाराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या भक्ती शक्ती संघाच्या वतीने आळंदी शहरातील निराधार नागरिकांना कडाक्याच्या थंडीतही इंद्रायणी नदीच्या…

‘स्वेरी’ च्या तब्बल १४ विद्यार्थ्यांची ‘कॉग्नीझंट’ कंपनीत निवड… वार्षिक परीक्षेच्या निकालाबरोबरच स्वेरीची प्लेसमेंटमध्ये देखील आघाडी

'कॉग्नीझंट’ कंपनीत निवड झालेले विद्यार्थी अनुक्रमे डावीकडून मानसी जगलपुरे, श्रद्धा धसाडे, शिल्पा ढोणे, प्रदीप्ता महिमकर, विद्या मोरे, सायली चव्हाण, कविता भोसले, सोनाली व्हनमाने, विशाल केंद्रे, विशाल मुंगुसकर, शिवश्री गोंजारी, अभिनव…

पंढरपूर तालुक्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातुन सर्वाधिक पगाराची नोकरी मिळवणारा विद्यार्थी सिंहगडचाच! ○ १० लाखांचे पॅकेज घेणारा वैभव कोळवले पंढरपूर तालुक्यातील पहिला विद्यार्थी

○ सिंहगडचे वैभव कोळवले यांना "बायजू" कंपनीकडून १० लाखांचे वर्षिक पॅकेजपंढरपूर: प्रतिनिधीएस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या वैभव कोळवले या विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून "बायजू" या नामांकित कंपनीत निवड झाली असल्याची माहिती प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर यांनी दिली. ............. Adv .............  "बायजू" ही जगातील सर्वात मूल्यवान शैक्षणिक क्षेत्रातील माहिती देणारी कंपनी आहे. भारतातील "सर्वात आवडती शाळा" शिक्षण ऍप ची निर्माती "बायजू" कंपनीने केली आहे. या कंपनीत १ ते १२ मधील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अनुकूल, आकर्षक आणि प्रभावी शिक्षण, कार्यक्रम तसेच एनईईटी आणि स्पर्धात्मक परीक्षेची तयारी या कंपनीकडून घेण्यात येते.आज ऍपमध्ये ७० दशलक्षांपेक्षा जास्त नोंदणीकृत विद्यार्थी आणि ४.५ दशलक्ष वार्षिक पेड सदस्य आहेत. १७०० हून अधिक शहरांतून दररोज सरासरी ७१ मिनिटे ऍपवर एखादा विद्यार्थी खर्च करत असताना,  शिक्षणाचा संपूर्ण नवीन मार्ग तयार करीत आहे.  २०१९ च्या सुरुवातीच्या काळात, संपूर्ण ऑफलाइन, ऑनलाईन शिकण्याच्या अनुभवात रूपांतरित करण्यासाठी "बायजू" कंपनीने शैक्षणिक खेळांची पालो अल्टो-आधारित निर्माती "ओस्मो" विकत घेतली. २०२० मध्ये, बायजू ने "व्हाईटहॅट जूनियर" ही एक भारतीय शैक्षणिक माहिती देणारी कंपनी देखील मिळविली. ही कंपनी विद्यार्थ्यांना परस्पर संवाद, कोडींग, अभ्यासक्रम उपलब्ध करते. "बायजू" हा भारतीय क्रिकेट संघाचा अधिकृत प्रायोजक देखील आहे. जागतिक स्तरीय शिक्षण अनुभव प्रदान करणे, बायजू प्रोग्राम शिकणे इत्यादींवर ही कंपनी काम करते."बायजू" ऍप प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वेगळ्या पद्धतीने आणि त्यांच्या शिक्षण पद्धतीनुसार अद्वितीय शिक्षण शैलीनुसार तयार करण्यासाठी डिझाइन केले आहे.   "बायजू" कंपनीत प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी,  ट्रेनिंग ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, प्रा. अतुल कुलकर्णी,  प्रा. भारत आदमिले, राजाराम राऊत आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ग्रामपंचायत रणांगण : खर्डीतील राजकीय वातावरण तापले

 खर्डी :-अमोल कुलकर्णी जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील खर्डीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी लगबग सुरू आहे.त्यासाठी लागणारी कागदपत्रे काढणे,जातीचे टोकन काढणे,बाकी भरणे आदी साठी रीघ लागली आहे.विद्यमान ग्रामपंचायत ही परिचारक गटाच्या ताब्यात…

क्विक हीलने वर्तवली २०२१ वर्षातील सायबर संकटांची भाकिते !! डबल एक्स्टॉर्शन, क्रिप्टो मायनिंग, एथिकल हॅकिंग यासारखे प्रकार वाढण्याचा अंदाज

 Pandharpur Live मुंबई,: कोरोना आणि संपूर्ण जगावरील त्याचे पडसाद यामुळे २०२० चे हे वर्ष अनपेक्षित घडामोडींनी चांगलेच गाजले. कोरोनामुळे व्यवसाय व बरेचसे दैनंदिन व्यवहार डिजिटल झाले खरे, पण त्यासोबतच सिस्टीम्समध्ये मॅलवेअर…

आद्यस्वयंभु शक्तीपीठ सप्तशृंगी माता मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले

Pandharpur Live Online | आद्यस्वयंभु शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगी माता मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे नूतनवर्ष निमित्ताने दर्शनार्थी भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता विश्वस्त संस्थेने श्री भगवती मंदिर भाविकांना २४ तास दर्शनासाठी…

घाबरण्याचं कारण नाही! महाराष्ट्रात नव्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही… राजेश टोपेंकडून मोठा दिलासा

 Pandharpur Live Online | 43 नमुन्यात एकही दुसऱ्या स्ट्रेनचा पॉझिटिव्ह रुग्ण नाही असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार…