प्रतिनिधी:
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे लाडक्या गणपती बाप्पाला अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला.
यावेळी सर्व शिक्षक आणि शिक्षिकांनी मिळून सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. या पठणानंतर सर्वांनी एकत्रितपणे बाप्पाच्या मूर्तीची महाआरती केली.
”गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”, “गणपती बाप्पा चले गावाला, चैन पडेना आम्हाला” अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. बाप्पाच्या नामाच्या या गजरात आणि उत्साही वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.
विद्यालयाच्या प्राचार्या सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई यांच्या हस्ते गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाप्पाला निरोप देताना उपस्थितांच्या चेहऱ्यावर बाप्पाच्या जाण्याची हुरहूर आणि पुढच्या वर्षीच्या आगमनाची ओढ स्पष्ट दिसत होती.
Posted inEducation
कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये गणपती बाप्पाला उत्साहात निरोप; सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने भारावले वातावरण

