👁 96 Views

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरापोस्टर सादरीकरण स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विजेत्यांचा पारितोषिक वितरणाने गौरव

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरापोस्टर सादरीकरण स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विजेत्यांचा पारितोषिक वितरणाने गौरव

पंढरपूर, दि. २५ सप्टेंबर २०२६: कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, शेळवे–पंढरपूर येथे जागतिक फार्मासिस्ट दिन २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षीची “Empowering Pharmacists for a Healthier Future” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन दोन सत्रांमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या व अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. नाझिया तांबोळी उपस्थित होत्या.


सकाळच्या सत्रात प्रमुख पाहुण्या प्रा. डॉ. नाझिया तांबोळी यांच्या हस्ते महाविद्यालयातील प्रेझेंटेशन हॉलचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आयोजित पोस्टर सादरीकरण स्पर्धेच्या मूल्यमापनास सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत डी. फार्म. व बी. फार्म.च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्र, औषधोपचार, आरोग्यसेवा व फार्मासिस्टची भूमिका यांसारख्या विविध विषयांवर माहितीपूर्ण व आकर्षक पोस्टर्स सादर केले.


दुसऱ्या सत्रात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून औपचारिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. सुषमा चौगुले यांनी करून दिली. यावेळी प्रा. नजमा शेख यांनी प्रा. डॉ. नाझिया तांबोळी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर प्रा. डॉ. नाझिया तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. त्यांनी फार्मासिस्टची आरोग्यसेवेतील भूमिका, औषधांचा योग्य वापर, रुग्णसेवेतील फार्मासिस्टचे योगदान तसेच भविष्यातील फार्मसी क्षेत्रातील संधी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना “मधुमेह व त्याचे औषधोपचार व्यवस्थापन” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी मधुमेहाचे प्रकार, कारणे, लक्षणे, निदान तसेच विविध औषधांचे कार्य, योग्य औषधोपचार पद्धती आणि रुग्णाच्या उपचारामध्ये फार्मासिस्टची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मोरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबतच कौशल्य, व्यावसायिक नैतिकता आणि समाजाच्या आरोग्याप्रती असलेली जबाबदारी जपली पाहिजे” असे आवाहन केले. तसेच जागतिक फार्मासिस्ट दिनाचा इतिहास, फार्मासिस्टची आरोग्यसेवेतील महत्त्वपूर्ण भूमिका तसेच फार्मासिस्टच्या विविध जबाबदाऱ्या याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी औषधांच्या सुरक्षित व योग्य वापरामध्ये फार्मासिस्टचे योगदान, रुग्णसेवेतील त्यांची भूमिका आणि समाजाच्या आरोग्यविषयक जनजागृतीमध्ये फार्मासिस्टचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली.
पोस्टर सादरीकरण स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा यावेळी पारितोषिक वितरण समारंभाद्वारे प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कु. समृद्धी खरात आणि कु. स्नेहा आदलिंगे यांनी मिळविले.
द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले. डी. फार्म. द्वितीय वर्षातील कु. सना काझी आणि कु. सनोबर इनामदार तसेच बी. फार्म. द्वितीय वर्षातील कु. प्रियांका पताळे आणि कु. शंभुराजे सावंत यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. विजेत्या विद्यार्थ्यांचे श्री पांडूरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक,उपस्थित मान्यवर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाची सांगता प्रा. अक्षय भेंकी यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. पोस्टर सादरीकरण चे समन्वयक म्हणून प्रा. आकाश राऊत यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वयन प्रा. विशाल वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *