नगरपरिषद कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शने महाराष्ट्रातील सर्व शासकीय व नगरपरिषद कर्मचारी दि.१२,१३,१४ जुलै २०१७ रोजी संपावर जाणार.
Pandharpur Live सोलापूर जिल्हा नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने नगरपरिषद कर्मचा-यांच्याविविध मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य नगरपरिषद समन्वय समितीचे राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनीलवाळुजकर, जिल्हाध्यक्ष कॉ.सिद्धाप्पा कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदेसमोर निदर्शने करण्यात आली. राज्यातील सर्व नगरपरिषद कर्मचारी यांना सातवा वेतनआयोग लागु करावा, नगरपरिषदांना सहा.वेतन अनुदान वेळेवर न दिल्याने नगरपरिषद कर्मचा यांचेतीन तीन महिने वेतन होत नाही. त्यामुळे सहा.वेतन अनुदान प्रत्येक महिन्याच्या १ तारखेसऑनलाईन त्या त्या नगरपरिषदेच्या खात्यावर जमा करावे. वारसा व अनुकंपाची पदे त्वरीतभरावेत. नगरपरिषदेमधील संवर्ग व इतर रिक्त पदे त्वरीत भरावीत.तसेच संवर्ग कर्मचा-यांच्या बदल्याबाबत नव्याने काढलेला अन्यायकारक आदेश त्वरीत रद्द करावा व पुर्वीप्रमाणेच राज्य (अ), विभागीय (ब), जिल्हा (क)…
