पांडुरंगाचे सेवेधारी, जनसामान्यांचे कैवारी पांडुरंग स्वरुपात लीन झाले… अवघी पंढरी नगरी गहिवरली… पांडुरंगाला उजवी प्रदक्षिणा घालुन कर्मयोगी सुधाकरपंत परिचारकांच्या अस्थिंचे चंद्रभागेत विसर्जन…
आज सबंध सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील जनतेने कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचे अस्थिस्वरुपात शेवटचे दर्शन घेतले. यावेळी अवघी पंढरी नगरी गहिवरलेली आढळुन आली. जनसामान्यांच्या सर्वांगीन विकासासाठी आजन्म चंदनाप्रमाणे झिजलेले…
