पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा
Pandharpur Live 18 September 2018 पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली. पंढरपूर सिंहगड मध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यातआलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन डाॅ. रविंद्र व्यवहारे, डाॅ. स्वानंद कुलकर्णी, टी. एस. मोटे, एन. एन. डिंगरे,श्रीराम मधुकर, अदिक निखिल आदी मान्यवरांच्या हस्ते इंजिनिअर डाॅ. विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेचे पूजन वदिपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमासाठी उपस्थिती इंजिनिअर यांचे शाल व पुष्प गुच्छ व प्रतिमादेऊन सन्मान करण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डाॅ. रविंद्र व्यवहारे म्हणाले,इंजिनिअर ने कष्ट घेतले पाहिजे त्या शिवाय यश मिळवता येत नाही. तुम्ही स्वतः इंजिनिअर म्हणून जीवन जगतअसताना विश्वेश्वरैया यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून करिअर करा. असे मत डाॅ. व्यवहारे यांनी व्यक्त केले.यादरम्यान टी.एस. मोटे बोलताना म्हणाले, आजच्या सुधारलेल्या जगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनखुप प्रगती झाली आहे. आजची जी प्रगती झाली आहे ती केवळ इंजिनिअर मुळे झाली आहे. आधुनिकभारताचा पाया विश्वेश्वरैया यांनी घातला आहे. अभियंता म्हणून त्यांनी केले कार्य समाजाला दिशादर्शक आहे असे मत मोटे यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभियंता दिवसाचे औचित्य साधूनमनोगत व्यक्त केले तसेच एन. एन. मोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अजयगाजंळे तर शिक्षक प्रतिनिधी प्रा. महिंद काटकर,प्रा. सोमनाथ कोळी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक वशिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी ऋतुजा पाटील व प्रशांत पाटील यांनीकेले तर आभार प्रदर्शन डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी मानले. महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर…
