👁 6 Views

फेसबुकवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये पंढरपूर तालुक्यातील एकावर गुन्हा दाखल

पंढरपूर LIVE 3 ऑक्टोबर 2018


फेसबुकवरून शिवीगाळ केल्याप्रकरणी पंढरपूर तालुक्यातील एकावर  माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार   शालीवाहन भागवत कोळेकर वय 51 वर्शे धंदा शेती रा.कोळेकर वस्ती, गुरसाळे ता पंढरपुर जि.सोलापुर यांनी फिर्याद दिली आहे की,  अंकुश महादेव शेंबडे रा. भटुंबर ता.पंढरपूर यांनी दिनांक 02/10/2018 रोजी 09-30वा व दिनांक 03/10/2018 रोजी 09-00 वाजण्याच्या सुमारास त्याचे फेसबुक व व्हाट्सअप अकौंटवरुन समाजामध्ये बदनामी करण्याच्या उद्देशाने  वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी मजकुर याने दिनांक 02/10/2018 रोजी व दिनांक 03/10/2018 रोजी अंकुश महादेव शेंबडे रा. भटुंबरे ता.पंढरपूर याने त्याचे फेसबुक अकौंटवरुन, वॉटसएप अकौंटवरुन धनगर आरक्षण कृती समिती महाराष्ट्र  राज्य सदस्यांना तसेच यातील फिर्यादी व त्याचे सहकारी विठठल पाटील यांना आर्वाच्च अश्लील शिवीगाळी करुन अपमानीत करुन त्यांची समाजात अप्रतिश्ठा केली म्हणून फिर्यादी यांची अंकुश महादेव शेंबडे रा.भटुंबरे ता.पंढरपूर याचे विरुध्द  फिर्याद आहे. वगैरे मजकूरचे फिर्यादीवरून  भाग 5 रजि. दाखल करुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहे.

दरम्यान अंकुश शेंबडे हा आंदोलनासाठी काल मुंबई येथे गेला होता. तेथे मलबार हिल पोलिसांना आज ताब्यात घेवुन 151 च्या कारवाईसाठी महानगर न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता  9 तारखे पर्यंत 6 दिवस आर्थर जेल मध्ये पाठवले आहे. अंकुश शेंबडे मुंबई येथुन परत येताच अटक करण्याची कारवाई केली जाईल. अशी माहिती देऊनआणखी कोणाच्या तक्रारी असतील तर पंढरपुर तालुका पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले आहे.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *