👁 4 Views

सत्ता आणि समाज वाचकांना घाबरत असतो- डॉ. वसंत आबाजी डहाके

पंढरपूर LIVE 2 डिसेंबर 2018


पंढरपूर: वाचक एक समीक्षक असतो, वाचक आणि आस्वादक साहित्याचे भान ठेवतात. चिकित्सा बुद्धिमत्तेतून येते. समीक्षा म्हणजे टीका करणे असे नाही, तर समीक्षेच्या सिद्धांतंनुसार साहित्याचे मूल्यमापन करणे होय.शब्दामधून भाव व्यक्त होत असतो, प्रगल्भ साहित्यासाठी तटस्थ समीक्षा होणे गरजेचे आहे, लेखकाच्या भीतीने सरकार प्रकाशित साहित्य दडपण्याचा  प्रयत्न करत असते, परंतु ही भीती लेखकांची नसून वाचकाची असते, कारण लेखकांचे प्रगल्भ व प्रभावी साहित्य वाचून वाचकांचे प्रबोधन होऊन क्रांती होण्याची शक्यता असते, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य सममेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी केले. 
पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील मराठी विभाग व महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पंढरपूर  यांच्या  सामंजस्य करार (MOU) अंतर्गत समीक्षा संमेलन व राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  या प्रसंगी समेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले म्हणाले की, घटित घटना, प्रसंग घडामोडीचा अभ्यास करून लेखक कल्पनेतून प्रगल्भ साहित्याची निर्मिती करतात, रचित साहित्य वाचकाचा प्रयत्न असतो, यासाठी समीक्षकाची भूमिका महत्वाची ठरते, आस्वाद म्हणजे समीक्षा नव्हे कलाकृतीबद्दल उमटलेली प्रतिक्रिया म्हणजे समीक्षा नव्हे, साहित्य कृतीचे  आकलन करून केलेली चिकित्सा म्हणजे समीक्षा होय. साहित्य क्षेत्रात भक्ति आणि भक्ताला स्थान नाही. यावेळी व्यासपीठावर, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. द. ता. भोसले, प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, आमदार दत्तात्रय सावंत प्रा.मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, सुनीतारजे पवार,प्राचार्य बी पी रोंगे, सौ साधनाताई भोसले, प्राचार्य दादासाहेब साळुंखे, पद्माकार कुलकर्णी, उद्धव कानडे, गिरीश चिटनीस, विशाल मलपे, प्रशांत शिंदे, सुरेश देशपांडे, नानासाहेब रत्नपारखी,  समन्वयक डॉ. देवानंद सोनटक्के, कल्याण शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते. 
उद्घाटन सत्रानंतर आजची समीक्षा समकालीन साहित्याला न्याय देते काय ? या विषयावर प्राचार्य डॉ.  महेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सुहास पुजारी, डॉ.राजशेखर शिंदे, आणि डॉ. पुरुषोत्तम काळे यांनी विचार मांडले, जेष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ.  द.ता.भोसले यांची प्रकट मुलाखत डॉ.चांगदेव कांबळे व सुनील जावंजाळ यांनी घेतकी, तसेच पुढील सत्रात खुले निबंध वाचन पार पडले या सत्राचे अध्यक्षपद डॉ. देवीदास गायकवाड यांनी भूषविले. समारोपाच्या सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत मोरे तर अध्यक्षपदी नागनाथ कोतापल्ले  होते. यावेळी उपप्राचार्यं बी जी तोडकरी, एस एस माने, एन एन तंटक, डॉ.राजाराम राठोड,  प्रा. सुभाष कदम, डॉ.रमेश शिंदे, प्रा. सारिका भंगे, धनाजी चव्हाण, अंकुश गाजरे, गणेश गायकवाड, राजेश पवार, महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षेकेत्तर सेवक व मराठी विभागातील  विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.  

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *