👁 4 Views

चारा दावणीला मिळावा… मंगळवेढा तालुक्यातील ‘त्या’ ४५ गावांची मागणी…

पंढरपूर LIVE 2 डिसेंबर 2018

४५ ग्रामपंचायतींनी तहसिलदार यांचेकडे ठरावाव्दारे केली मागणी

मंगळवेढा- निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असनाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी ४५ गावातील ग्रामपंचायतींनी ठराव करुन दुष्काळी परिस्थितीत चारा दावणी द्यावा अशी एक मुखी मागणी तहसिलदार यांचेकडे केली असल्याची माहिती ४५ कोरडवाहू संघर्ष समितीचे निमंत्रक अंकुश पडवळे यांनी दिली.
सध्या ४५ गावात भीषण चारा टंचाई निर्माण झाली आहे. सहा ठिकाणी रास्तारोको केल्या नंतर प्रशासनाने चारा नियोजनाबाबत जलद हालचाली केल्या आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी व चारा टंचाई बाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. तसेच ४५ गावातील तलाठी चारा छावणी मागणी अर्ज भरून घेतले जात आहेत.
दरम्यान पावसावर अवलंबून असनाऱ्या तालुक्यातील ४५ गावांतील सर्वच ग्रामपंचायतींनी ग्रामपंचायतींच्या ठरावा व्दारे चारा दावणीला मिळावा अशी मागणी तहसिलदार आप्पासाहेब समिंदर यांचेकडे केली आहे. रास्तारोको आंदोलना प्रसंगी हि सर्व शेतकऱ्यांनी चारा छावणी ऐवजी दावणीलाच मिळावा आशी एकमुखी मागणी केली होती. तसेच मागील काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व पशुसंर्धन मंत्री महादेव जानकर यांनी शेतकऱ्यांच्या मागणी नुसार चारा दावणीला व छावणीत हि दिला जाईल असे जाहिर केले होते. पण दावणी बाबतचा निर्णय अद्याप झालेला दिसून येत नाही. पण मंगळवेढा तालुक्यातील ४५ गावांनी ठराव करुन चारा दावणीलाच द्यावा अशी मागणी केली आहे. कारण ४५ गावातील सर्वच शेतकऱ्यांचा चारा संपला आहे. तसेच पुढे आठ ते नऊ महिने पाऊस पडे पर्यंत जनावरे घेऊन छावणीत राहणे प्रॕक्टीकली अवघड आहे असल्याचे पं.स. सभापती प्रदिप खांडेकर व
बाळासाहेब लेंडवे यांनी सांगितले.
जर एका कुटुंबातीत दोनच सदस्य असतील व चारा छावणी पाच सहा किमीवर असेल तर शेतकऱ्यांनी घर सांभाळावे, शेळी, कुक्कटपालन सांभाळावे की, छावणीत राहवे याबाबत शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे तसेच ४५ गावातील चारा टंचाई भिषण असल्याने शआभर टक्के लोकांना जनावराःना चारा हवा आहे, पण शंभर टक्के लोकांना छावणीत जनावरे आणणे अवघड आहे असे प.स.सदस्य नितीन पाटिल व तानाजी जाधव यांनी सांगितले. 

तसेच छावणी मध्ये चारा, पशुखाद्य व पाण्यासाठी लाइनला उभे राहूनच सर्व गोष्टी मिळवाव्या लागणार आहे. त्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांची मोठी दमछाक होणार आहे. त्यामुळे चारा दावणीलाच मिळावा व तो तातडी ने उपलब्ध करावा अशी आमच्या ४५ गावातील लोकांची मागणी असल्याचे संघर्ष समितीचे सदस्य बापूसाहेब मेटकरी व अशोक भगरे यांनी केली.

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *