👁 7 Views

समता परिषदेचे कार्य समाजाच्या विकासासाठी भविष्यात दिशादर्शक ठरेल – माजी खासदार समीर भुजबळ

पंढरपूर LIVE 3 डिसेंबर 2018

 फुलचिंचोली येथे समता गौरव पुरस्काराचे मान्यवरांचे हस्ते वितरण 
पंढरपूर (प्रतिनिधी) अखिल भारतीय समता परिषद स्थापना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब यांनी ओबीसी समाजाला तसेच सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी केली आहे. क्रांतीसुर्य महात्मा फुलेे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गेेली अनेक वर्षेे फुलचिंचोली सारख्या ग्रामीण भागातील समता शाखेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या व्यक्तीना गेली १३ वर्ष विविध क्षेत्रातील व्यक्तीना पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहे हे कार्य कौतुकास्पद असुन सामाजिक बांधिलकी जोपासून अनेकांना प्रेरणा देण्याचे काम अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शाखा फुलचिंचोली करत आहे. यापुढे असेच सामाजिक उपक्रम फुलचिंचोली शाखेने राबवून नवीन कलाकारांना व उल्लेखनीय कामगिरी करीत असलेल्या व्यक्तीना पुरस्कार द्यावेत. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असणार आहे यापुढे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समता परिषद कार्य भविष्यात दिशादर्शक ठरेल असे मत माजी खासदार समीर भुजबळ यांनी फुलचिंचोली (ता.पंढरपूर) येथील समता गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
    

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शाखा फुलचिंचोली यांच्या वतीने समता गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यमान आमदार भारत भालके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार समीर भुजबळ उपस्थिती होते. यावर्षीच्या पुरस्कार मानकरी कला क्षेत्रातील पुरस्कार विद्या सावळे, सामाजिक पुरस्कार बाळासाहेब वाघमारे शैक्षणिक पुरस्कार सावित्री कस्तुरे, कृषी पुरस्कार सिताराम रणदिवे, दैनिक पुढारी चे पञकार प्रमोद बनसोडे, साहित्य पुरस्कार शशिकांत जाधव आदींना सन्मान चिन्ह, हार, शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान पुर्वक प्रदान करण्यात आले.
 
 कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार भारत भालके बोलताना म्हणाले, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जात असताना थोर महापुरूष्यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करणे महत्वाचे आहे. अशा कार्यक्रमामधुन युवकांना एक चांगली प्रेरणा मिळत असते. आजच्या या परिस्थिती मध्ये महात्मा फुले यांच्या विचाराचा वारसा जपणे खुप महत्वाचे आहे. शेतक-याचा असुड पुस्तक प्रत्येक घरात पाहिजे केवळ सामाजिक दृष्टिकोनातून महााात्मा फुले याांनी शेतक-यांच्या असुड या पुस्तकातून शेेेेतक-यांची अवस्था मांडली आहे. शेतक-यांची आज अवस्था खुप दैनिय झाली आहे. जयंती व पुण्यतिथी माध्यमातून महात्मा फुले यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवायचे असेल तर महापुरूष्यांचे पुतळे असले पाहिजे जेणे करून आपण आपल्या लहान मुलांना त्या पुतळ्यासमोर घेऊन जात असताना महापुरूष्यांचे कार्य सांगितले तर युवा नेतृत्व चांगले तयार होईल. पण हे सर्व करीत असताना महापुरूष्यांचे पुतळे उभे करीत असताना राजकीय दृष्टिकोनातून त्या बघु नये असे मत आमदार भारत भालके यांनी फुलचिंचोली येथील समता गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
         

या कार्यक्रमासाठी महामंडळचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, दत्ताञय घाडगे, महासंघाचे उपाध्यक्ष सोमनाथ राऊत, सावता परिषद मंगळवेढा अध्यक्ष सयाजी बनसोडे, अविनाश बनसोडे, अवधुत घोडके, दत्ताञय बनसोडे, अक्षय आदलिंगे, संतोष बनसोडे, जयंत भंडारे, मधुकर माळी, सपना माळी, बाळासाहेब माळी आदीसह समता परिषदेचे सर्व पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
    
 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पञकार सावता  जाधव, निलेश मोहिते, शाखाध्यक्ष शंकर बनसोडे, श्याम गोडसे, चंद्रकांत काळे, ग्रा प सदस्य जयंता जाधव, दिपक प्रक्षाळे, सद्दाम मणेरी, बबलू बनसोडे, समाधान जाधव, आकाश जाधव आदीसह समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रा. सिद्धेश्वर तोरकडे यांनी केले तर उपस्थिती मान्यवरांचे आभार अध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *