पंढरपूर LIVE 3 डिसेंबर 2018
विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत अधिक जनजागृती व्हावी आणि त्यांचा सहभाग वाढावा या हेतूने सुलभ निवडणूका’ कार्यक्रमाचे आयोजन आज अल्पबचत भवन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मोनिका सिंह, अपंग कल्याण उपआयुक्त नितीन ढगे, एकांश स्वयंसेवी संस्थेच्या श्रीमती अनिता अय्यर नारायण, जलतरणपटू व ब्रँड म्बेसेडर सुयश जाधव, मतदार नोंदणी अधिकारी सुरेश जाधव, भारत वाघमारे, दिव्यांग संघाचे अध्यक्ष दादा आल्हाट यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, भारतीय लोकशाही प्रगल्भ आहे. लोकशाहीमध्ये एक व्यक्ती-एक मत’ अशाप्रकारची कार्यवाही अपेक्षित आहे. दिव्यांगासाठी तळमजल्यावर मतदान केंद्र स्थापन करणे तसेच अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व दिव्यांगांचे नांव मतदार यादीमध्ये नोंदविण्यासाठी शासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. यासाठी दिव्यांगांना सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करुन देताना, दिव्यांगाप्रती भावनिक न होता कर्तव्यबुध्दीने कार्य करण्याची सूचना त्यांनी केली. शासकीय कामामध्ये दिव्यांगांना जिल्हा प्रशासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
अपंग कल्याण उपआयुक्त नितीन ढगे यांनी, अपंग कल्याण व्यक्ती हक्क कायदा-2016 व त्यावर आधारित अपंग व्यक्तीसंदर्भातील धोरण-2018 मधील तरतूदींची माहिती यावेळी दिली. शिघ्र हस्तक्षेप व उपचार या भूमिकेतून दिव्यांगांकडे लक्ष देण्यात येत असल्याचे सांगितले. उच्च शिक्षणासाठी दिव्यांगांनी पुढे यावे व निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असे आवाहन त्यांनी केले.
एकांश स्वयंसेवी संस्थेच्या अनिता अय्यर नारायण यांनी, दिव्यांग धोरणामध्ये एकवीस प्रकारच्या दिव्यांग प्रकाराला शासनाने मान्यता दिल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाच्या सुलभ निवडणूका या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी प्रास्ताविकामध्ये, सुलभ निवडणूका उपक्रमाची माहिती दिली. अपंग मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत अधिक जनजागृती व्हावी आणि त्यांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा हेतू असल्याचे सांगितले.
आंततराष्ट्रीय ख्यातीचा जलतरणपटू सुयश जाधव याला जिल्हाधिकारी नवल किशेार राम यांच्याहस्ते यावेळी दिव्यांग मतदार नोंदणी मोहिमेचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला पाहिजे, अशी सूचना यावेळी त्याने केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोथरुड येथील अंध मुलींच्या शाळेतील विद्यार्थींनींनी स्वागत गित गाऊन उपस्थितांचे स्वागत केले. प्रसिध्द नृत्यांगना प्रेरणा सहाने दिक्षीत हीने यावेळी भरतनाटयम सादर केले. आभार प्रदर्शन मतदार नोंदणी अधिकारी भारत वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाला विविध संस्थांचे प्रतिनिधी, दिव्यांग मोठया संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत अधिक जनजागृती व्हावी आणि त्यांचा सहभाग वाढावा या हेतूने सुलभ निवडणूका’ कार्यक्रमाचे आयोजन आज अल्पबचत भवन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मोनिका सिंह, अपंग कल्याण उपआयुक्त नितीन ढगे, एकांश स्वयंसेवी संस्थेच्या श्रीमती अनिता अय्यर नारायण, जलतरणपटू व ब्रँड म्बेसेडर सुयश जाधव, मतदार नोंदणी अधिकारी सुरेश जाधव, भारत वाघमारे, दिव्यांग संघाचे अध्यक्ष दादा आल्हाट यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com