👁 7 Views

पंढरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम… बिबट्याची शिकार ठरल्याने नुकसान झालेल्या पशुपालकांना नुकसानभरपाई…. वाखरी येथील गायकवाड यांना 23 हजार रुपये मंजुर- पंढरपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.एन.पवळे यांची माहिती

पंढरपूर LIVE 3 डिसेंबर 2018

” पूर्वी जंगलात राहाणारा बिबट्या आता उसाच्या फडात राहू लागला आहे. जन्म आणि पुढील वावरही उसाच्या फडात असलेली बिबट्याची पिढी आता जंगल विसरते की काय, अशीच स्थिती झाली आहे. ऊस तोडला की हेच बिबटे गावात येऊन धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे केवळ जंगली आणि डोंगरी भागांत असलेले बिबटे आता अन्यत्रही दिसू लागले आहे. त्यांच्यापासून सुरक्षेसाठी आता नव्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.  झपाट्याने कमी होत जाणार्‍या जंगलांमुळे मार्जार कुळातील वाघ, सिंह, चित्ता या प्राण्यांचे अस्तित्व संकटात सापडले असले तरी अतिशय चाणाक्ष समजल्या जाणार्‍या बिबट्याने मात्र याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. मानवी आक्रमणामुळे वन्यप्राण्यांचा हक्काचा अधिवास नष्ट होत चालल्याने त्यांनी मानवी वस्त्यांकडे मोर्चा वळवला आहे. सध्या पंढरपूर तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याचे प्रकरण चांगलेच गाजत असून अद्यापही हा बिबट्या जेरबंद न झाल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याची दहशत कायम आहे. ”


गेल्या कित्येक दिवसापासून वनविभागाला बिबट्याचा शोध घेऊन त्याला पकडता आलेले नाही. यासंदर्भात पंढरपूर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.एन. पवळे यांच्याशी पंढरपूर लाईव्हने बातचित केलीय. त्याचा

हा सविस्तर वृत्तांत.  पंढरपूर तालुक्यात बिबट्याने दोन शेळ्या व एका गायीची शिकार केल्यामुळे पशुपालकांचे नुकसान झाले आहे. सदर पशुपालकांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासननिर्णय 11 जुलै 2018 नुसार नुकसान भरपाई व अर्थसहाय्य मिळण्यासाठीचा प्रस्ताव पाठवला आहे. सर्वात आधी वाखरी येथील विकास गायकवाड यांच्या गायीची शिकार बिबट्याने केली होती. त्यांना 23 हजार 395 रु. एवढी आर्थिक नुकसान भरपाई मंजुर झाली असून लवकरच ही रक्कम अदा करण्यात येणार आहे. तसेच इतर पशुपालकांनाही नुकसान भरपाई मिळावी यासाठीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती पंढरपूर लाईव्हशी बोलताना पंढरपूर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.एन. पवळे यांनी दिली आहे.


बिबट्याला पकडण्यासाठी या उपाययोजना केल्या
गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर पंढरपूर तालुक्यात आहे. परंतु अद्यापही बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अपयश आल्याचे दिसून येत आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थ बीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. याबाबत श्री. पवळे यांना पंढरपूर लाईव्हने विचारणा केली असता बिबट्याला पकडण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. वनविभागाच्या कर्मचार्‍यांचे गस्तपथक नेमलेले आहे. बिबट्यापासून घ्यावयाची खबरदारी व उपाययोजना याबाबतच्या पत्रकांचे वाटप ग्रामीण भागात केले आहे. तसेच प्लेक्सही उभे केले आहेत. वाखरी, गादेगाव, उपरी या गावात ग्रामसभा घेऊन या सभेतही जनजागृती केलेली आहे. बिबट्या हा प्राणी मांजरासारखा असतो. तो सहजासहजी त्याच्यापेक्षा उंच असलेल्या प्राण्यावर हल्ला करत नाही. वाखरीतील गाय कदाचित बसलेली असल्यामुळे तिच्यावर त्याने हल्ला केला असेल. अशी माहिती त्यांनी पंढरपूीर लाईव्हशी बोलताना दिली.

 बिबट्याला कधी पकडणार? यावर ते म्हणाले की, वनविभागामार्फत योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. वाखरी हून भाळवणी व भाळवणीतून आता तो पिराची कुरोली शिवारात असल्याची माहिती मिळतेय. ऊसाच्या शेतीमुळे त्याला शोधुन पकडणेत अडथळा येत आहे. त्याला पकडण्यासाठीची कार्यवाही चालु आहे.

बिबट्या अधिवास क्षेत्रात काळजी घेण्याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी, पंढरपूर कार्यालयाकडून प्रसिध्द केलेले पत्रक  



एकुणच बिबट्याने वाखरी, गादेगाव, उपरी, भाळवणी अशी परिक्रमा करत आता पिराची कुरोली गाठली आहे. आत्तापर्यंत बिबट्याने शिकार केलेल्या दोन शेळ्या व एका गायीच्या पालकांना आर्थिक नुकसानभरपाई मिळेलही परंतु जोपर्यंत बिबट्या सापडत नाही तोपर्यंत पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थ भीतीच्या सावटाखालीच रहाणार हे नक्की. बिबट्या कधी मिळणार? हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे.

अतिशय चाणाक्ष व लपूनछपून हल्ला करण्यात तरबेज असणारा बिबट्या पिंजर्‍यात अथवा सापळ्यात अडकण्याची चिन्हे कमीच आहेत. बिबट्यास पकडल्यानंतर पुन्हा निसर्गातच मुक्त करावे लागत असल्याने ही समस्या सोडविण्यासाठी सर्वांचाच पुढाकार आवश्यक आहे. त्यांचे नैसर्गिक घर त्यांना परत देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. वनविभागाकडून वनक्षेत्रात रोपांची लागवड केली जात आहे. वनाच्छादित क्षेत्राची टक्केवारी वाढल्यास या समस्येची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. वन्यप्राण्यांना जंगलातच सर्व गोष्टी मिळत असल्याने त्यांना त्यांचा निवारा पुन्हा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आपलीच आहे. अभयारण्य तयार करुन देण्याने तात्पुरता प्रश्न मार्गी लागू शकेल. परंतु, यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी वनाच्छादित क्षेत्र वाढवणे ही काळाची गरज बनली आहे.

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *