पंढरपूर LIVE 4 डिसेंबर 2018
पंढरी नगरीत १४ डिसेंबर व १५ डिसेंबर रोजी देश विदेशातील संशोधकांची मांदियाळी
पत्रकार परिषदेत संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांची माहिती
पंढरपूर– ‘येत्या १४ डिसेंबर आणि १५ डिसेंबर २०१८ या दोन दिवशी स्वेरीमध्ये ‘टेक्नोसोसायटल– २०१८’ आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेचे आयोजन केले असून भारतातून व भारताबाहेरून येणाऱ्या संशोधक, शास्त्रज्ञाच्या स्वागतासाठी स्वेरी सज्ज झाली आहे. यासाठी सर्व विभागातील प्राध्यापक आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत. या तंत्रपरिषदेच्या निमित्ताने गोपाळपूर परिसरात भारतातील शास्त्रज्ञाबरोबरच जगभरातील शास्त्रज्ञ येत आहेत. ही परिषद संशोधकांना सामाजिक जाणीवेतून तंत्रज्ञान निर्माण करून, तंत्रज्ञानातून सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रेरीत करेल. या आंतरराष्ट्रीय परिषदेस भारत सरकारच्या बी.आर.एन.एस., डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँण्ड टेक्नोलॉजी तसेच ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन या संस्थांचे संशोधन अनुदान प्राप्त झाले आहे. या परिषदेचे काम आता अंतिम टप्यात आले असून शोध पेपर्स सादरीकरणासाठी स्वतंत्र सहा सेमिनार हॉल उभारले आहेत.’ अशी माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट पंढरपुरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
येथील स्वेरीमध्ये येत्या १४ डिसेंबर आणि १५ डिसेंबर २०१८ या दोन दिवशी ‘टेक्नोसोसायटल– २०१८’ आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेविषयी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे बोलत होते. या परिषदेची जय्यत तयारी झाली असल्याचे दिसून येत आहे. डॉ. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र समित्या स्थापन केल्या असून या तंत्रपरिषदेचे समन्वयक डॉ. प्रशांत पवार हे परिषदेच्या यशासाठी कार्यरत आहेत. श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट या नावात नमूद असल्याप्रमाणे संशोधन (रिसर्च) क्षेत्रातसुद्धा स्वेरी आघाडीवर आहे. या तंत्रपरिषदेत राष्ट्रीय स्तरावरील नामवंत प्राध्यापक व संशोधकांना निमंत्रित करून २०१४ मध्ये भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांच्या सहाय्याने प्रथमच “थीम मिटींग”चे आयोजन महाविद्यालयात केले गेले. हीच परंपरा स्वेरीत सुरु आहे. याच थीम मिटींगचा विस्तारित आणि व्यापक अविष्कार ‘टेक्नोसोसायटल– २०१६’ या आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेच्या माध्यमातून दोन वर्षापुर्वी झाला होता.त्या परिषदेला देखील अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता. यंदा देखील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध विद्याशाखांना एकाच छताखाली संशोधनाच्या रूपाने समाजोपयोगी उपक्रमासाठी एकत्र आणण्याचे ऐतिहासिक कार्य या तंत्र परिषदेद्वारे पार पाडले जाणार आहे. सामाजिक प्रगतीसाठी सुरु असलेल्या संशोधनाला प्रकाशात आणण्याचे काम ही तंत्रज्ञान परिषद करणार आहे. या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समाजाच्या सकारात्मक बदलाच्या संधी विकसित करणे, तंत्रज्ञानाचे सामान्य जनांसाठी प्रात्यक्षिक, प्रत्यक्ष ग्रामीण भागात तंत्रज्ञान राबविताना येणाऱ्या अडचणी, स्वेरीच्या ग्रामीण तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करणार्या केंद्राचे मार्गदर्शन संशोधन विकासासाठी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञानाबरोबर आपल्या संकल्पनांची देवाण घेवाण, संशोधनासाठी आवश्यक निधी मिळणेबाबत सुयोग्य मार्गदर्शन इ. विषयांवर सखोल मार्गदर्शन व चर्चा होणार आहे.
या आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेचे उदघाटन भारताच्या पहिल्या लाईट कॉम्बॅट एअरक्राप्ट या विमानाचे मुख्य डिझाईनर पद्मश्री डॉ. कोटा हरीनारायण यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालीनी फडणवीस ह्या लाभल्या आहेत. मुख्य मार्गदर्शक म्हणून इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचे प्रा. डॉ. डॅनियल स्टीन स्त्रा हे लाभले आहेत. या तसेच बल्गेरियातील सोफिया विद्यापीठाचे डॉ. झ्लात्का व्हाजारनिस व डॉ. मारिया नेनोवा, इस्त्राईलमधील मुक्त विद्यापीठाचे डॅना हरारी, अमेरिकेतील साऊथ डीकोटा विद्यापीठाचे डॉ. संतोष के.सी., पिठाडीया फौंडेशनचे चेअरमन दिलीप पिठाडीया व टेक्सास ए. अँण्ड एम. विद्यापीठाचे टिस सेंटरचे डायरेक्टर डॉ. सतीश बुक्कापटणम, केनियामधील नैरोबी विद्यापीठातील थॉमस मबुया, जर्मनीचे भारतातील इंडो-जर्मन कन्सल्टंट अरमीन हक, बेंगलोरमधील आय.आय. एस. सी. चे डॉ. के. राजन्ना व प्रा. जे.एम. चंदरकिशन, बी.ए.आर.सी.चे हेमंत सोड्डे, डॉ. गुलशन रेलहान, डॉ. आर. बालसुब्रमण्यम व रमांकात रात, महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाचे डॉ. अजित पाटणकर व डॉ. व्ही.व्ही. महाजनी, डिफेन्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी,पुणेमधील डॉ. दिनेश सिंग ठाकूर, आय.आय. टी. मुंबईचे डॉ. वरदराज बापट, इंडस्ट्रीयल एक्स्पर्ट बी.एच. श्रीनाथ हे ही मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत.
दोन दिवस चालणार्या या परिषदेत देश-विदेशातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये दोनशे सत्तरहून अधिक शोधनिबंध या परिषदेसाठी संकलित झाले असून हे शोध निबंध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘स्प्रिंगर’प्रकाशकांकडून पुस्तक स्वरूपात प्रकाशित होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे संस्थेचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंध वाढतील व संशोधनामध्ये वाढ होवून महाविद्यालयाच्या प्रगतीतही महत्वाचे पाऊल ठरेल. या परिषदेदरम्यान विविध नामांकित देशी, परदेशी संस्थांशी सामंजस्य करार होणार असून ते समाजोपयोगी ठरतील. यापूर्वी संपन्न झालेल्या ‘टेक्नोसोसायटल –२०१६’परिषदेचे स्प्रिंगर या आंतर राष्ट्रीय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या शोधनिबंध पुस्तिकेतून आत्तापर्यंत छत्तीस हजाराहून जास्तवेळा शोध निबंध डाऊनलोड केले आहेत. त्यामुळे ही पुस्तिका स्प्रिंगरद्वारे मागील वर्षाच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह परसेंटमध्ये गणण्यात आली होती. यावर्षीही संशोधकांनी समाजातील विविध प्रश्न तंत्रज्ञानाच्या आधारे सोडविण्याकरिता केलेल्या संशोधनावर शोध निबंध जमा केले आहेत. यामध्ये शेती व ग्रामीण भागाच्या तंत्रज्ञान, आरोग्य विभागासाठी लागणाऱ्या मायक्रो नॅनो संशोधन, तसेच सोलार, बायोडिझेल व सॅटेलाईट तंत्र ज्ञानावर आधारित लक्षवेधी ठरतील असे शोध निबंध जमा झाले असल्याची माहिती तंत्र परिषदेचे समन्वयक डॉ. प्रशांत पवार यांनी दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रचंड मेहनतीने हुशारी मिळवत असताना त्याला उच्च तंत्रशिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत होते. त्यासाठी आर्थिक संकटांना त्यांना तोंड द्यावे लागत होते. हे लक्षात आल्यावर, मुला-मुलींची तळमळ लक्षात घेवून केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकारीता आम्ही श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पंढरपूर अर्थात ‘स्वेरी’ या नावाने सन १९९८ साली तंत्रशिक्षणाचे दालन सुरु केले. तेव्हापासून आजतागायत या ठिकाणी पदवी अभियांत्रिकी बरोबरच पदविका अभियांत्रिकी, व पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी तसेच पदवी फार्मसी, पदविका फार्मसी, पदव्युत्तर पदवी फार्मसी, एम.बी.ए तसेच पी.एच.डी अभियांत्रिकी, पी.एच.डी फार्मसी हे अभ्यासक्रम सुरु केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या शैक्षणिक संकुलामुळे पुण्या-मुंबईला जाण्याची आता गरजच उरली नाही. स्वेरी एक उपक्रमशील शैक्षणिक संस्था म्हणून सर्वदूर आदराने चर्चिले जाणारे एक शैक्षणिक संकुल आहे. भारताचे जेष्ठ शास्त्रज्ञ, पंतप्रधानांचे माजी सल्लागार, अॅटोमिक एनर्जी कमिशनचे माजी अध्यक्ष, राजीव गांधी सायन्स व टेक्नोलॉजी कमिशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र भूषण व पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर यांनी तयार केलेली शिक्षण पंढरी ही योजना भारतात सर्वप्रथम पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पंढरपुरच्या माध्यमातून दर्लिंग विद्यालय चळे, न्यू इंग्लिश स्कूल अनवली, लोटस इंग्लिश स्कूल कासेगाव, सीताराम विद्यालय खर्डी व दौलतराव विद्यालय कासेगाव या पाच शाळा श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युटशी नॅशनल नॉलेज नेटवर्कच्या १०२४ एम.बी. पी. एस. क्षमतेच्या वायफाय इंटरनेटद्वारे जोडल्या आहेत. शिक्षणाबरोबरच आता संशोधन क्षेत्रातदेखील स्वेरी आघाडीवर आहे. आज मितीस जवळपास ५.७५ कोटींचा निधी प्राप्त झाला असून भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर (BARC) च्या संयुक्त विद्यमाने आधीच स्वेरीने ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अगदी गरीब शेतकऱ्यांच्या उंबरठ्यापर्यंत नेल्या आहेत. यशस्वी शिक्षण देत असताना संशोधन प्रक्रियादेखील सुरु झाली आणि एक एक यशाची शिखरे पादाक्रांत होऊ लागली. यासाठी स्वेरीतील प्रत्येक प्राध्यापक व प्रत्येक सदस्य यांचे चिकाटीचे प्रयत्न देखील विसरून चालणार नाहीत.
येत्या १४ व १५ रोजी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्थरावर संशोधन क्षेत्रात वातावरण आणखी बहरणार आहे आणि याला निमित्त आहे, स्वेरीत होऊ घातलेली दुसरी आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषद ‘टेक्नोसोसायटल– २०१८’ च्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या स्वेरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय संशोधनाची चर्चा आणि विविध नव्या ग्रामीण व पायाभूत सुविधा संदर्भातल्या विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठाची निर्मिती होत आहे. अनेक ख्यातकिर्त, नामवंत व प्रज्ञावंत असे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय संशोधक या तंत्रमहोत्सवात सहभागी होणार असून सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात या महोत्सवाची दखल घेतली जाणार आहे.
या तंत्रपरिषदेमुळे संशोधक शास्त्रज्ञाना नवनवीन संशोधन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून, भारताच्या विकासाच्या दृष्टीने देखील नवे पाऊल पडणार आहे. स्वेरीच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये या कार्यक्रमाचे नियोजन केले असून पार्किंग, सुरक्षा, निवास व भोजन व्यवस्था या महत्वाच्या विभागांची अत्यंत काळजी घेण्यात येत आहे. ही परिषद देखील प्रचंड उत्साहात होत असून याकडे जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा यांनी आभार मानताना म्हणाले की, ‘पत्रकार नेहमी सर्वोत्तम कामगिरी बजावत असताना समाज उपयोगी संशोधन सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहेत.’ असे सांगून पत्रकारांचे आभार मानले. या पत्रकार परिषदेसाठी सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, तंत्रपरिषदेचे समन्वयक डॉ. प्रशांत पवार यांच्यासह स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com