👁 10 Views

पंढरपूर-मोहोळ मार्ग अपघात: आ. प्रशांत परिचारकांनी दाखविली समयसुचकता… उपजिल्हा रुग्णालयात जाऊन केली तातडीची मदत…

पंढरपूर LIVE 3 फेब्रुवारी 2019

               

     

 काल दि. 2 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर- मोहोळ मार्गावर घाडगे वस्ती, देगाव येथे इको कार आणि एस.टी. बस समोरासमोर धडकल्याने घडलेल्या भीषण अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यु झाला. या भीषण अपघाताची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांना मिळतातच त्यांनी तातडीने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. काल रात्री 7 वाजता उपजिल्हा रुग्णालयात जाऊन त्यांनी आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी एका राजकीय नेत्यातील समयसुचकतेचे व संवेदनशीलतेचे अनोखे दर्शन घडले. यावेळी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक धनंजय जाधव, नगरसेवक विक्रम शिरसट, नगरसेवक गुरुनाथ अभ्यंकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
               
आ. परिचारक हे उपजिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर त्यांनी तातडीने अपघातातील मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून या अपघाताची माहिती दिली. गंभीर जखमी असलेल्या धनश्री सुरेश सावंत हिच्यावर तातडीचे उपचार होण्यासाठी सोलापूर येथील रुग्णालय प्रशासनाला आवश्यक त्या सुचना दिल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे उपजिल्हा रुग्णालयात रात्रीच्यावेळी मृतदेहांचे शवविच्छेदन केल केले जात नाही. परंतु आ.प्रशांत परिचारक यांच्या सुचनेनुसार रात्रीच सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. सकाळी लवकर शववाहिकांची सुविधाही आ.परिचारक यांच्यामुळे झाली. आणि सर्व मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे त्यांच्या गावाकडे पाठविण्यापर्यंतची व्यवस्था आ. परिचारक यांच्या प्रयत्नामुळे अधिक जलद गतीने झाली. 

सहसा राजकीय नेते मंडळी ही स्वत:चा राजकीय फायदा बघूनच समाजसेवा करतात एक अलिखित समज समाजमनात दृढ होऊ पहात आहे. अशा घटना घडतात तेंव्हा नुसता दिलासा दयायचा किंवा शोक व्यक्त करायचा आणि काढता पाय घ्यायचा असेही अनुभव कमी नाहीत. कालच्या अपघातानंतर तर अपघातग्रस्त हे बाहेरच्या गावचे असल्यामुळे त्यांची साधी चौकशी करण्यासाठीही कोण स्थानिक राजकीय नेता जाईल की नाही? याबाबतचे प्रश्‍नचिन्ह निर्माण झालेले असताना आ. प्रशांत परिचारक हे सदर अपघाताबाबत नुसती चौकशी करुनच थांबले नाहीत तर रात्री बराच वेळ उपजिल्हा रुग्णालयात थांबून त्यांनी आवश्यक ती मदत उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले. ही गोष्ट निश्‍चितच उल्लेखनीय आहे. 


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *