पंढरपूर LIVE 3 फेब्रुवारी 2019
अपघातानंतर बंद पडलेले इको कारचे स्पीडो मीटरचा काटा 60 वर स्थिर झालेला आढळला
काल दि. 2 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर- मोहोळ मार्गावर घाडगे वस्ती, देगाव येथे इको कार आणि एस.टी. बस समोरासमोर धडकल्याने घडलेल्या भीषण अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यु झाला. नेमका हा भीषण अपघात कशामुळे घडला असावा? याबाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक धनंजय जाधव यांच्याकडून समजलेल्या माहितीनुसार पंढरपूर लाईव्हचा हा विशेष वृत्तांत.
गाडीत आढळलेले सर्दीसाठी घेण्यात येणारे औषध (सिरफ)
अपघातग्रस्त इको कारचे स्पीडो मिटर गाडीच्या धडकेनंतर बंद पडले. या मिटरचा काटा हा 60 वर स्थिरावलेला आढळतो. म्हणजेच अपघात घडला तेंव्हा या गाडीचा वेग हा 60 असावा. अपघातग्रस्त मारुती ईकोचा स्पिड गव्हर्नर इंटॅक्ट आहे. 80 च्या स्पिडला लॉक आहे, म्हणजे ईकोचा स्पिड 80 पेक्षा निश्चित जास्त नव्हता. अपघातग्रस्त वाहनामध्ये सर्दीसाठी घेण्यात येणारे औषध (सिरफ) मिळाले आहे, याचा अर्थ सिरफ घेतल्यामुळे डुलकी लागल्याने हा अपघात घडला असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.
अपघातग्रस्त ईको मधील मृतक प्रवाशी शुक्रवार दि. 1 फेब्रुवारी रोजी नातेपुते येथे नातेवाईकांकडे मुक्कामाला होते, तेथुन तुळजापुर, अक्कलकोटला जावुन मुक्काम केला काल शनिवारी पंढरपूरकडे येत होते, म्हणजे प्रवास आणी जागरण देखील फार झाले होते असे ही म्हणता येणार नाही, चालकाची पुरेशी झोप झाली होती. घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करता बस चालकाने ब्रेक मारलेले दिसत आहे, परंतु ईको चालकाने ब्रेक मारल्याचे दिसत नाही, म्हणजे स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न देखील अजिबात केला नाही, सरळ येवुन बसवर आदळला आहे. चालकाचे 55 वर्ष हे वय सुध्दा विचारात घेणे आवश्यक आहे. कोकणे कुटूंबातील जेष्ठ असणारे 55 वर्षीय सुरेश रामचंद्र कोकणे हे गाडी चालवत होते. त्यांना ड्रायव्हिंग करताना डुलकी लागल्याने हा अपघात घडला असावा. अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे.
समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात…?
पंढरपूर लाईव्हला समजलेल्या माहितीनुसार इको गाडीचे चालक हे त्यांच्या समोरच्या एका गाडीला ओव्हटेक करत होते. ओव्हरटेक करताना समोरुन अचानक वेगात आलेली एस.टी. बस आणि इको गाडीची धडक झाली. ही घटना याचवेळी तुंगतकडून पंढरपूरकडे येत असणार्या मोटारसायकलस्वारांनी पाहिली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणार्या एस.टी. बसकडे दुर्लक्ष झाल्याने इको गाडी एस.टी. ला धडकून हा अपघात घडला असावा. अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
जे घडले ते अत्यंत क्लेषकारक, दु:खद घडले. या अपघाताचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होऊ लागली. आणि पुन्हा एकदा रस्ते आणि अपघात? अपघातामुळे जाणारे निष्पाप जीव हे सत्र कधी थांबणार? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघातातील गंभीर जखमी धनश्री सुरेश सावंत या मुलीवर सोलापूर येथील बदलवा रुग्णालयात उपचार सुरु असून तिची अद्याप मृत्युशी झूंज सुरु आहे.
काल पंढरपूरकडून सोलापूरकडे जाणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या इस्लामपूर आगाराच्या इस्लामपूर- अक्कलकोट या एस.टी. चक- 07- उ- 9017 ला मोहोळकडून समोरून येणारी इको मारुती चक-03- Aन-3116 ही गाडी जोरात धडकली होती. या अपघातामध्ये
सुरेश रामचंद्र कोकणे वय-55 (कारचालक), सचिन सुरेश कोकणे वय -35, सविता सचिन कोकणे वय- 30, आर्यन सचिन कोकणे- वय-10, श्रद्धा राजेंद्र सावंत वय- 30, प्रथम राजेंद्र सावंत वय- 15 सर्व रा. घाटकोपर मुंबई, मुळ राहणार घोडेगाव, ता. जुन्नर, जि. पुणे. यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com