मराठा महासंघाचे वतीने मराठा समाजातील तरुणांना उदयोग धंद्यासाठी कर्ज प्रकरणे देत आहे।यासाठी शासन सहकार्य करत आहे। मात्र मराठा समाजातील तरुणांना उद्योग उभारण्यासाठी येथून पुढे जे सरकार चांगला निर्णय घेईल। त्या सरकारच्या पाठीशी मराठा महासंघ ठामपणे उभारणार आहे। यात राजकारणाचा भाग नसून तरुणांच्या हितासाठी मराठा महासंघ निर्णय घेत आहे। आतापर्यंत सरकारने फसवणुकीचे धोरण राबविले आहे। जे सरकार फसवणूक करणार नाही। जे सरकार मागास विकास महामंडळाला 1 हजार कोटी देणार असतील व मराठा समाजातील तरुणांना उद्योग, व्यवसाय,शिक्षण, नोकरी,आरक्षण, उभारणीस हातभर लावतील।त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहोत। असे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी या प्रसंगी सांगितले।तसेच कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ च्या वतीने देण्यात येत असलेल्या कर्ज प्रकरणासाठी कोणी पैशाची मागणी करत असेल तर प्रकरण कर्त्यांनी पैसे देऊ नयेत. प्रकरणाकरिता पैसे देऊन स्वतःची फसवणूक करू नका. प्रकरणाबाबत काही अडचणी असतील तर थेट संपर्क साधण्याचे आवाहन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी केले आहे.
यावेळी बँक व्यवस्थापक धनंजय करंडे,कैलास शिर्के यांच्यासह विविध मांण्यवरांनी आपले मार्गदर्षन पर मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे,संघटक सतीश धनवे, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, उपाध्यक्ष प्रशांत नागणे, शहर अध्यक्ष अमोल पवार,शहर संघटक काका यादव,रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड,उपाध्यक्ष यशवंत बागल, प्रणव गायकवाड,महेश बोडके, पांडू शिंदे,उमेश क्षीरसागर,, विकास चव्हाण,सोमा पवार,अजिंक्य पवार,महेश बेलकर,सागर पवार,नंदू पवार,अनिल जमदाडे,महिला शहर अध्यक्ष संगीता पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रभावती गायकवाड, युवती तालुकाध्यक्ष अॅड प्राजक्ता शिंदें,निर्मला जाधव,रतन थोरवत,प्रशांत जाधव,सचिन जाधव,राहुल जाधव,भास्कर घायळ, दिपक खुर्द,अक्षय खुर्द,कुणाल घुले, नवनाथ मगर, आदींसह मराठा महासंघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.