👁 12 Views

पंढरपूर येथे सुजात आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

Pandharpur LIVE 24 March 2019

 

पंढरपूर…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आणि ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश  आंबेडकर यांचे पुत्र आयु. सुजात आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दिनांक 23/03/2019, रोजी सायं. 6.00 वाजता फरताळे महाराज मठ, उंच विठोबा शेजारी, भक्ती मार्ग, पंढरपूर येथे वंचित बहुजन आघाडीची सोलापूर लोकसभा मतदारसंघ नियोजन बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सुनिल वाघमारे होते.

यावेळी अ.भा.माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे, ह.भ.प. अरुणभाऊ बुरघाटे महाराज, राजकीय विश्लेषक प्रा. धैर्यशील भंडारे, पत्रकार श्रीकांत कसबे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सेवागिरी गोसावी, बी. आर. भोसले, भारिपचे पंढरपूर तालुकाध्यक्ष ऍड. सुरेश कांबळे, मंगळवेढा तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष महादेव ढोणे, एमआयएमचे तालुकाध्यक्ष जुबेर बागवान, भारिपचे शहराध्यक्ष प्रकाश दुपारगुडे, आपचे सचिव नागेश पवार, बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळणकर, बारा बलुतेदार संघटनेचे भाई किशोर भोसले, युवा जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड, शहाजी लोखंडे, विनोद कांबळे, नाथा कांबळे, अक्षय जगताप उपस्थित होते.
सदर नियोजनाच्या बैठकीस वंचित बहुजन समाजातील व अल्पसंख्यांक समाजातील युवकांची मोठी उपस्थिती होती. सुजात आंबेडकर यांच्या मार्गदर्शनामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बैठकीचे सूत्रसंचालन प्रा. रवींद्र रणदिवे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष योगेश मोरे यांनी मानले.

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *