👁 11 Views

‘कोळ्याची नारी.. घे भरारी!’ हे ब्रीद वाक्य घेऊन पंढरीत कोळी समाजाच्या महिला भगिणींचे संघटन…. चंद्रभागा महिला मंडळाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

Pandharpur LIVE 23 March 2019




Video News

‘‘कोळ्याची नारी.. घे भरारी!’ हे ब्रीद वाक्य घेऊन पंढरीत 8 फेब्रुवारी 2018 रोजी स्थापन झालेल्या ‘चंद्रभागा महिला मंडळाचा’ प्रथम वर्धापन दिन पंढरीत साजरा करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पंढरपूर शहर व येथील इतिहासावर आधारीत ‘प्रश्‍नमंजुषा’ स्पर्धा, कॅटवॉक ही ‘चंद्रभागा क्विन’ स्पर्धा, ‘संगीत खुर्ची’ स्पर्धा, व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांमध्ये कोळी समाजाच्या महिला भगिणींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. 

मंडळाच्या आधारस्तंभ सौ.शशिकला मोहन अभंगराव व संस्थापिका सौ. जयश्री जयंत अभंगराव यांच्या संकल्पनेतून सर्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं  मंडळाच्या माजी अध्यक्षा सौ.अम्रिता उत्तम अभंगराव, माजी खजिनदार सौ.अर्पिता अमोल अभंगराव, विद्यमान अध्यक्षा कु. उर्मिला श्रीकांत अभंगराव, विद्यमान खजिनदार सौ.भाग्यश्री जीवन अभंगराव, कार्यकारिणी सदस्या सौ.अंजली संजय कोळी, सौ.राजश्री सुरेश अभंगराव यांनी सर्व स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. परीक्षक म्हणून शिवसेनेच्या पंढरपूर तालुका महिला संघटक सौ.आरती ओंकार बसवंती यांनी काम पाहिले.  

महिलांच्या अंगी असलेल्या विविध कला-गुणांना वाव देण्यासाठी विविध समाजाची महिला मंडळे आहेत परंतु कोळी समाजाच्या महिलांसाठी असे एकही मंडळ नव्हते. त्यामुळे कोळी मसजातील महिला भगिणींना एकत्रीत करुन समाजातील महिलांचा आपसात सुसंवाद व्हावा यासाठी आम्ही हे मंडळ काढले असल्याची माहिती यावेळी मंडळाच्या संस्थापिका सौ. जयश्री जयंत अभंगराव यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.    

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *