सर्वसामान्य गरीब कुटुंबातील रुग्णाची महागडया सुपर स्पेशालीटी अथवा खाजगी दवाखान्यातील अतिदक्षता विभागाचे बील भरण्याची अर्थिक कुवत नसते.मात्र तातडीच्या उपचाराची गरज भासल्यास त्याच्या कटुुंबाना खाजगी सावकारांकडुन भरमसाठ व्याजाने कर्ज काढून रुग्णास खाजगी दवाखान्यातील आयसीयु मद्ये दाखल करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.पंढरपूर हे तिर्थक्षेत्र असल्याने यात्रा कालावधीत येथील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येतो.तर शहरातील अनेक दवाखाने यात्रा कालावधीत बंद असतात तर खाजगी डॉक्टर पंढरपूर बाहेर असतात.अशा वेळी काही आपत्ती कोसळल्यास अथवा दुर्घटना घडल्यास तातडीने उपचाराची सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे हे लक्षात घेवून पंढरीतील उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग सरु करण्यात आला.मात्र जवळपास वर्षभरापासून हा विभागच मृतावस्थेत आहे.त्यामुळे विक्रम शिरसट मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी आज उपजिल्हा रुग्णालयात जावून बंद आयसीयुच्या प्रवेशद्वारास पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहीली.
यावेळी बोलताना पंढरपूर नगर पालीका पाणी पुरवठा समितीचे सभापती विक्रम शिरसट यांच्या हस्ते प्रवेशद्वारास पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी बोलताना ते म्हणाले की,उपजिल्हा रुग्णालयास गेल्या काही वर्षापासून अवकळा प्राप्त झाली आहे.येथे पुरेश्या प्रमाणात डॉक्टर्स व इतर सहाय्यक कर्मचारी उपलब्ध नाहीत.याबाबत आम्ही वेळोवेळी निवेदने दिली आहेत.आंदोलने केली आहेत.यासाठी केलेल्या आंदोलनामुळे आमच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत.मात्र सर्वसामान्य लोकांच्या जिवनमरणाचा प्रश्न असल्याने आपण येथे विविध सुविधा उपलब्ध झाल्यापाहीजेत यासाठी पाठपुरावा करीत आहोत.येथील अतिदक्षता विभाग सुरु झाला पााहीजे अशी मागणी वारंवार करीत आहोत.मात्र त्याची दखल घेतली जात नाही.उपजिल्हा रुग्णालयात खाजगी व्यक्तीस फोटो घेण्यास अथवा छायाचित्रण करण्यास मनाई असल्याने येथील असुविधा जनतेसमोर येत नाहीत.आमच्या या आंदोलनाची दखल घेवून मयत अतिदक्षता विभाग पुन्हा जिवंत करावा अन्यथा आम्हास यापेक्षाही उग्र आंदोलन करावा लागेल असा इशारा विक्रम शिरसट यांनी दिला आहे.
यावेळी सोमनाथ कोळी,कपील वाघमारे,ॠषी साठे,रामभाऊ माळी,राजु परचंडे,अमर घाटे,निलेश परचंडे यांच्यासह विक्रम शिरसट मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111