पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदन देताना पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे पदाधिकारी.
पंढरपूर : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा लवकरात करावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लीकन पार्टीच्यावतीने पंढरपूर नगरपालिकेकडे करण्यात आली आहे.
पंढरपूर नगरपालिकेने पुढाकार घेऊन पंढरपूर अर्बन बॅँक, राजर्षी शाहु विचार मंच, आ. भारत भालके, आ. प्रशांत परिचारक यांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा नियोजीत केला आहे. त्या सोहळ्यास खूपच दिरंगाई होत आहे. महामानवाच्या स्मारकाच्या अनावरणासाठी पदाधिकाºयांच्या तारखांची दिर्घ प्रतिक्षा करावी लागत आहे. हे त्या महामानवाची अवहेलना नव्ह का ? ही अवहेलना आहे ! असा पंढरपुरातील जनमानस आहे. महामानवाच्या प्रतिमेची अवहेलना होऊ नये असे आपणास वाटत असेल तर आपण महामानवाच्या प्रतिमेचे अनावरण व लोकार्पण लवकर करावे. तसेच सोहळ्यासाठी पीपल्स रिपब्लीकन पार्टीच संस्थापक प्रा. जोगेंद्र कवाडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी निमंत्रण देण्यात यावे. या मागणीचे निवेदन पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव यांनी प्रशासकीय अधिकारी कुलकर्णी व नगराध्यक्षा साधना भोसले यांना दिले आहे.
यावेळी तुकाराम रणपीसे, सुरज इंगळे, सुरज जाधव, आबासाहेब रणपीसे, रवी घोडके, विलास थोरात, गोपीनाथ माळी, बाबासाहेब गंथाडे उपस्थित होते.





