👁 9 Views

खासदार शेट्टींना सदाभाऊंनी का सोडले ?

सदाभाऊ खोत हे एक असे नाव जे सोलापूर जिल्ह्यात खूप गाजले.यामागच्या अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण म्हणजे सोलापूर लोकसभा निवडणूक.या निवडणुकीत सदाभाऊ खोत उतरले होते आणि तेही राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात.आणि आता राज्यमंत्री झालेल्या सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.आता त्यांचा बोलबाला केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित राहीला नसून संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. आत्ताची राजकीय परिस्थिती पहिली कि अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होतात.पण आता हे सांगण्यात काही अर्थ नाही कारण सदाभाऊ हे भाजप मध्ये जाण्यास तयार आहेत.खासदार राजू शेट्टी एक असा माणूस ज्या माणसाने शेतकऱ्यांची शेतकरी संघटना चालवली व शेतकऱ्यांना वेळोवेळी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णाकाठच्या सुपीक पट्टय़ातील साखर कारखानदारीला आव्हान देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वत:चे वर्चस्व स्वतः निर्माण केले. शेवटी सदाभाऊ खोत यांच्या रूपाने सरकारमध्ये संघटनेला स्थानही मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करीत असताना राज्यमंत्री खोत यांचे महत्त्व वाढविण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला.सांगली, कोल्हापूर जिल्हय़ातील कृष्णा, पंचगंगा नदीकाठाला असलेल्या ऊस शेतीवर आधारित स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ उभी राहिली. काल-परवापर्यंत या चळवळीतील आक्रमक नेते म्हणून सदाभाऊ खोत यांची ओळख होती. अगदी संघटनेचे कार्यकर्ते खोत यांची मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळखहि करून देत होते. मात्र विधान परिषदेचे सदस्यत्व आणि राज्यमंत्रीपदाची झूल अंगावर येताच या आक्रमकपणाला सत्तेच्या माध्यमातून रोखण्यात आल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.शेतकऱ्यांचा खरा प्रतिबिंब म्हणून ओळख असलेले सदाभाऊ खोत आता शेतकरी संघटना सोडल्यावर शेतकरी बांधवांना विसरतील का ? कि सरकारमध्ये राहून शेतकरी बांधवांचे प्रश्न मंत्रालयाच्या दारी मांडतील ? हे येणारा काळच सांगेल.

*स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडू नये म्हणूनच खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळण्यासाठी आपली राजकिय शक्ती पणाला लावली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून सदाभाऊ यांना विधानपरिषदेचे आमदारकी देत राज्यमंत्रीपदही बहाल करण्यात आले होते.एवढे करूनही सदभाऊंनी खासदार राजू शेट्टी यांची साथ का सोडली ह्या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.*

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *