👁 9 Views

अखेर शेतकऱ्यांचा संप मागे, मध्यरात्री चार तास मॅरेथॉन बैठक

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मध्यरात्री चार तास झालेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर शेतकऱ्यांनी अखेर हा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या 80 टक्के मागण्या मान्य झाल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्यानंतर दोन दिवस सुरु असलेला संप मागे घेण्यात आला.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा आणि शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी, अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपाची हाक दिली होती. त्याला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळाला होता.राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यासाठी सरकारकडून एक समिती स्थापन करणार असल्याची घोषणा करण्यात आली असून ही समिती 31 ऑक्टोबरपर्यंत आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहेत.तसंच दुधाचे भाव वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. किंमत 20 जूनपर्यंत निर्णय होईल.आंदोलनात ज्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला त्या शेतकऱ्याच्या परिवाराला सरकार आर्थिक मदत करणार.मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्देहमीभावापेक्षा कमी भाव देणे हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात येईल. येत्या अधिवेशनात त्याबाबत कायदा करण्यात येणार आहे.राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे.दुधाच्या भावासंदर्भात तटस्थ निरीक्षक नेमण्यासंदर्भात विचारवाढीव वीज बिलाचा पुनर्विचारथकीत बिलाचे व्याज आणि दंडव्याज रद्द करण्याचा निर्णयशीतगृह साखळी निर्माण करणारनाशवंत शेतमालासाठी प्रक्रिया उद्योग आणणारशेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेतले जातील, मात्र गुंडावरचे गुन्हे मागे घेतले जाणार नाही

अण्णांनाही शेतीत फटका; खर्च दीड लाख, हाती ~ २५ हजार! 
 नगर – राज्यातील शेतकऱ्यांच्या बेमुदत संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांची अापल्याला जाण अाहे, सरकारने या प्रश्नांची दखल घ्यायला हवी. अामच्या संस्थेनेही अाधुनिक सेंद्रिय पद्धतीने काही पिके घेतली मात्र याेग्य भाव न मिळाल्याने अाम्हाला त्यात नुकसान सहन करावे लागले,’ असेही सांगत अण्णांनी शेतकऱ्यांचे दु:ख अधाेरेखित केले.
कर्जमाफीचे संकेत देत संप फाेडण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्नशरद पवारांचा अाराेप
मुंबई –‘संपूर्ण कर्जमाफी होत नाही तसेच इतर मागण्यांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत शेतकरी वर्गाने आपली एकी व आंदोलन कायम ठेवावे. अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत संकेत देऊन फडणवीस संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत’, असा अाराेप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला अाहे.   
‘शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसणे ही अभूतपूर्व, पण सरकारच्या दृष्टीने नामुष्कीची घटना आहे. राज्यातील या परिस्थितीला केवळ सध्याचे सरकार कारणीभूत आहे. एकीकडे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी अादित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी िदली, परंतु महाराष्ट्र सरकारने येथील शेतकऱ्यांना तोच न्याय िदला नाही. शेतकऱ्यांना संपवण्याचे धोरण सध्याच्या राज्य सरकारचे असल्याने शेतकरी संपावर गेला आहे’, अशी टीकाही पवारांनी केली.   िनवडणुकांपूर्वी भाजपने शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे उत्पादने खर्चाच्या आधारे शेतीमालाला िकंमत देण्याचे आश्वासन िदले होते, पण निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या. त्या आश्वासनाची व अन्य मागण्यांची अंमलबजावणी सरकारने तातडीने करावी, अशी मागणी पवारांनी केली.    
शेतकऱ्यांच्या तीव्र भावना मी समजू शकतो, मात्र रस्त्यावर दूध ओतून देणे, भाजीपाला-फळे टाकून िनषेध करणे, हा हाती घेतलेला कार्यक्रम वेगळ्या आंदोलनाच्या स्वरूपात करावा. दूध-भाजीपाला रस्त्यावर टाकून वाया न घालवता गावामधील गरीब घटकांना वाटप करावा अाणि गावातील सामान्य लोकांची व आपली नाळ भक्कम करावी, असेही पवार म्हणाले.
भाजप सरकारकडून फसवणूक : राज ठाकरे
राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारने सत्तेसाठी शेतकऱ्यांची फसवणूक केली, अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे  यांनी शुक्रवारी केली. दोन दिवसांपासून राज्यातील शेतकरी संपावर आहेत. या पार्श्वभूमीवर राज यांनी आपली भूमिका मांडली. भाजप सरकार खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आले. सरकारने शेतकरी आणि जनतेची फसवणूक केली. तिकडे सीमेवर जवान आणि इकडे शेतकरी मरत आहेत. मात्र, भाजपावाले खुशाल आहेत, असा आरोपही राज ठाकरे यांनी 
नगर तालुक्यातील बाबूर्डि बेंद येथे माउली दूध डेअरी व भैरवनाथ दूध डेअरी सभासदांच्या च्यावतीने सरकारच्या निषेधार्थ नगर-दौंड महामार्गावरील प्रवाशांना दूध पाजुन व रस्त्यावर दूध, बटाटे ओतून शेतकारी संपात उस्फुर्त सहभाग घेतला. यावेळी माउली दूध डेअरी चे चेअरमन संदीप चोभे, भैरवनाथ दूध डेअरी चे चेअरमन अंकुश इंगळे, आप्पा कोठुले, सोसायतीचे माजी चेअरमन भाऊसाहेब चोभे, वैभव खेंगट,अक्षय खेंगट, भाऊसाहेब निमसे, सुनील चोभे, महेश चोभे आदी.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *