लंडन –आयर्लंडच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे डॉ. लिओ वराडकर यांची निवड झाली. वराडकर आयर्लंडचे सर्वांत तरुण पंतप्रधान आहेत. लिओ यांचे मूळ गाव सिंधूदुर्ग जिल्ह्यातील वराड हे आहे. सत्ताधारी फाइन गिल पक्षाच्या मंत्रिमंडळात समाजकल्याण खाते सांभाळणाऱ्या लिओ यांना पंतप्रधान एंडा केनी यांच्या राजीनाम्यामुळे झालेल्या निवडणुकीत विजय मिळाला. ३८ वर्षीय लिओ या महिनाअखेरपर्यंत पंतप्रधानपदी विराजमान होतील.
तीन इलेक्ट्रोल कॉलेजसह अंतिम फेरीत वराडकर यांना ६० टक्के मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी सायमन कोव्हेनी यांना ४० टक्के मते मिळाली.
लिओ यांचे वडील डाॅ. अशोक वराडकर १९६० मध्ये इंग्लंडला गेले. नंतर इंग्लंड ते आयर्लंड असा प्रवास करत ते १९७३ मध्ये वैद्यकीय व्यवसायासाठी आयर्लंडला स्थायिक झाले. तेथेच मरिअम नामक नर्सशी लग्न केले. १९७८ मध्ये डब्लिनमध्ये लिओ यांचा जन्म झाला. ते या देशाचे पहिले गे (समलिंगी) पंतप्रधान ठरतील.





