औरंगाबाद – शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी शहरात दाखल झाल्याची माहिती आहे. मात्र शेतकरी मारहाण करतील या भितीने ते घरी न जाता अज्ञात स्थळी थांबले आहेत. सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शेतकरी संप स्थगित झाल्याची घोषणा केली होती. मात्र शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य न झाल्याने संपात फुट पडली आणि त्यांनी संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
जयाजी सूर्यवंशी सकाळी 8 वाजता औरंगाबादेत दाखल झाल्याची माहिती आहे. मात्र ते अद्याप निवासस्थानी पोहोचलेले नाही. त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या निवासस्थानी बैठक होणार असल्याची माहिती होती, मात्र बैठक सुरु झाली की नाही हेही समजू शकलेले नाही.
संप मागे घेतल्याचा पश्चताप होतोय… जयाजी सूर्यवंशी
दरम्यान, सूर्यवंशी यांनी एका चॅनलच्या चर्चेत, घाईघाईत संप मागे घेण्याच्या निर्णयाचा पश्चताप होत असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यामधील पैठण तालुक्तायील जायकवाडी आणि पाचोड येथे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. पाचोडमध्ये शेतकऱ्यांसोबतच व्यापारी आणि शिवसेनेने बंदला पाठिंबा दिला
आहे.
Posted inMaharashtra





