शेतकऱ्यानं कडून नामदेव पायरीला दुग्धाआभिषेक
राज्यातील बळीराजाला न्याय मिळण्यासाठी आज पंढरपूर मधील श्री विठ्ठल मंदिराच्या महाद्वारातील नामदेव पायरीला शेतकऱ्यांनी दुग्धाआभिषेक घालून मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी देण्यासाठी पांडुरंगाला साकडे घातले.
यावेळी भजन ही करण्यात आले, तसेच आषाढी यात्रेला मुख्यमंत्र्याच्या शासकीय महापूजेस विरोध करणार असल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
तसेच सोमवार दिनांक ०५/०६/२०१७ रोजी कडकडीत पंढरपूर बंद ठेवणार असल्याची घोषणा यावेळी केली.
सरकार विरोधी घोषणा दिल्या, शेतकऱ्यांचा संप अजून मिटला नसल्याचेही सांगितले, सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली असून याबाबत सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या…





