भोपाळ -शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे मध्यप्रदेशातील तप्त वातावरण अजूनही कायम आहे. आंदोलकांनी आज काही ठिकाणी जाळपोळ केली. आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाचे लोण इतरही काही भागांत पसरल्याने परिस्थिती आणखीच आव्हानात्मक बनली आहे. त्यातून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना शांत करण्याच्या उद्देशातून काही उपाययोजना जाहीर केल्या.
कर्जमाफी आणि शेतमालाला चांगला भाव मिळावा आदी मागण्यांवरून मध्यप्रदेशमधील शेतकऱ्यांनी सात दिवसांपासून आंदोलन हाती घेतले आहे. या आंदोलनादरम्यान मंगळवारी झालेल्या गोळीबारात 5 शेतकरी मृत्युमुखी पडले. त्यामुळे त्या राज्यात आणखीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. शेतकरी आंदोलनाचे तीव्र पडसाद प्रामुख्याने मध्यप्रदेशच्या पश्चिम भागांत उमटत आहेत. शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी दाखल झालेले मंदसौरचे जिल्हाधिकारी एस.के.सिंह यांना आज शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. मध्यप्रदेशातील स्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशातून केंद्र सरकारने दंगलविरोधी रॅपिड ऍक्शन फोर्सचे 1 हजार 100 जवान पाठवले.
दरम्यान, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव उद्या (गुरूवार) मंदसौरचा दौरा करणार आहेत. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांची ते भेट घेणार असल्याचे समजते. मध्यप्रदेशातील घडामोडींवरून विरोधकांनी मुख्यमंत्री चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





