परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी चर्चा करताना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष संकेत ढवळे, गणेश बनसोडे, अनिकेत शिरसट व कार्यकर्ते
पंढरपूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात असणार्या शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थी एसटी बसने प्रवास करीत येतात. त्याचबरोबर अनेक शिक्षकही बसने प्रवास करीत येत आहेत. मात्र बसेस बस थांब्याच्या ठिकाणी थांबवल्या जात नसल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांना 2 ते 4 किमी अंतर पायी चालून शाळेच्या ठिकाणी जावे लागत असल्याने त्यांचा वेळ वाया जात असल्याने अध्ययन व अध्यापनात अडचणी येत आहेत. त्यामूळे विद्यार्थी व शिक्षकांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून बस थांब्याच्या ठिकाणी बसेस थांबवाव्यात अशी मागणी परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांचेकडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष संकेत ढवळे यांनी केली आहे.
शैक्षणिक वर्षे 2017-18 ला सुरुवात झाली आहे. विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयाच्या ठिकाणी ये-जा करीत आहेत. त्याचबरोबर येत्या 15 जून पासून प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु होत आहेत. ग्रामीण भागातून शहरी भागात त्याचबरोबर ग्रामीण भागात असणार्या विद्यालयात, महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी पास काढून एसटी बसने ये-जा करीत असतात. मात्र मुख्य रस्ता ते महाविद्यालय व विद्यालय हे 2 ते 4 किमी दूर असल्याने त्यांना विद्यालयापर्यंत पायी चालत जावे लागते. हीच बस जर बस थांब्यावर शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत थांबवल्या तर विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा वेळ वाचणार असून एक प्रकारे शैक्षणिक कार्यात हातभार लागणार आहे. त्यामूळे जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयाच्या बस थांब्यावर सर्व आगाराच्या बसेस थांबवण्यात याव्यात अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने परिवहन राज्यमंत्री देशमुख यांचेकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष गणेश बनसोडे, अनिकेत शिरसट, गजानन ननवरे, आकाश घोडके, जावेद शेख आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




