*सोलापूर :-*दिनांक 12-06-2017 रोजी सायं 6-00 वा चे सुमारास मा.पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या माहितीवरून व त्यांनी दिलेल्या आदेशान्वये त्यांच्या टिमने पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील वाखरी गावातील ग्रामपंचायत पाठीमागील 1) सदाशिव पांडूरंग अभंगराव 2) राकेश अंकुश लोखंडे हे आरोपी नं 1 याचे राहते घरी देशी, विदेशी व हातभट्टी दारूची अवैधरित्या विक्री करीत असताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 15,602 रू किंमतीचा साठा जप्त करून आरोपी विरुध्द पंढरपूर तालुका पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*या प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री विरेश प्रभू सर यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील स.पो.नि संदिप धांडे , पोना अमृत खेडकर, मिलिंद कांबळे, अंकूश मोरे, पो.कॉ अमोल माने, प्रवीण पाटील, बाळराजे घाडगे, पांडूरंग केंद्रे, बालाजी नागरगोजे यांच्या टिमने हे काम केले आहे.*




