पंढरपूर दि. 16
:- आषाढी यात्रेच्या कालावधीत शहरात मोठ्या
संख्येने भाविक दाखल होतात. यात्रा कालावधीत पावसाळा सुरु असल्याने आरोग्य
विभागाने अधिक दक्ष व जागरुक रहाणे गरजेचे आहे. यासाठी पुरेसा औषधसाठा तज्ज्ञ
डॉक्टर व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे अशा सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड
यांनी दिल्या.

पंढरपूर
आषाढी यात्रेच्या तयारी बाबत शासकीय
विश्रामगृह पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते
यावेळी प्रांतधिकारी डॉ.विजय देशमुख, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, उप-जिल्हा
रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ.माया शेळके तसेच संबधित विभागाचे अधिकारी
उपस्थित होते.

आषाढी यात्रेसाठी येणा-या भाविकांना सोयी सुविधां उपलब्ध करुन देण्याबाबत
प्राधान्य द्यावे. पालखी तळ, 65 एकर, नदी पात्र, पत्रा शेड या ठिकाणी स्वच्छ
पिण्याच्या पाण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. नगरपालिकेने शहरातील नालेसफाई, अतिक्रमणाबाबतची कामे
तात्काळ करावीत तसेच वेळोवेळी औषध फवारणी करण्यात यावी अशा सुचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारुड यांनी दिल्या. यावेळी पंढरपूरात येणा-या भाविकांसाठी मंदिर समिती तसेच प्रशासनाकडून देण्यात येणा-या सुविधांची माहिती प्रांतधिकारी डॉ.देशमुख यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111