पंढरपूर: प्रतिनिधी
वालचंदनगर ( ता.इंदापूर, जि.पुणे) येथील फडतरे उद्योग समुहाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उत्तरप्रदेशातील शहाजहानपूर येथील 11 व्या मराठा लाईफ इन्फंट्रीस देण्यात आला. शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे पिताश्री मुन्नागीर गोसावी यांच्याहस्ते हा पुतळा मेजर धैयशील जगदाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
भारतीय लष्करातील जवानांना प्रेरणा मिळावी, त्यांचे मनोबल वाढावे याकरिता उत्तरप्रदेश येथील शहाजहानपूर येथे असलेल्या 11 व्या मराठा लाईफ इन्फट्री येथे बसवण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा शुक्रवार ( दि.16 जुन) देण्यात आला. शहाजहानपूर येथे हा पुतळा लष्करी तळावर बसवण्यात येणार आहे. पंढरपूर येथे बनवून घेतलेला हा पुतळा शुक्रवारी शहाजहानपूरकडे पाठवण्यात आला.
भारतीय सैन्यदलात मराठा बटालियन आहे. पंढरपूर येथील मुर्तीकार लखन चौगुले आणि त्यांच्या बंधूनी तयार केलेली ही शिवरायाची मुर्ती आज शुक्रवारी शहाजानपूर कडे पाठविण्यात आला.
यावेळी बोलताना उद्योगपती उत्तमराव फडतरे म्हणाले की, ङ्गबोलो छत्रपती शिवाजी महाराज की जयङ्ख ही तेथील बटालियनमधील जवानांची घोषणा आहे. त्यांना प्रेरणा मिळावी, लढण्याचे बळ मिळावे म्हणून हा पुतळा त्यांना देण्यात आला आहे.
वीरपीता मुन्नागीर गोसावी यांनीही यावेळी हा पुतळा भारतीय लष्करातील जवानांना प्रेरणा देत राहील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी फडतरे उद्योग समुहाचे प्रमुख उत्तमदादा फडतरे, वीरपीता मुन्नागीर गोसावी, माजी नगराध्यक्ष बाबासाहेब अधटराव, मेजर धैर्यशील जगदाळे, वस्ताद भीमराव माळी, भा. ज. पा. चे शहराध्यक्ष सौदागर मोळक, प्रकाश जगदाळे, सोमनाथ कोताळकर, दत्तात्रय फडतरे, मधुकर पाटील, कालिदास देवकर, भारत विश्वनाथ जगदाळे, जयंत फडतरे, विष्णू गोरे आदी उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




