येथील पुजारवाडी, एकतपूर रोड नजीक चालू असलेल्या अवैध मटका अड्ड्यावर पोलिसांनी शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांना मिळालेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
सांगोला पोलीस ठाणे हद्दीत एकतपूर रोड नजीक संजय जाधव हा मन्ना नावाने एक जुगार अड्डा चालवत होता. त्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर शनिवारी (दि.८) रोजी पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत संजय भारत जाधव, विकी विजय साळुंखे, राहुल रविंद्र काटे, वैभव भारत बनसोडे (सर्व रा. सांगोला), राजेंद्र रूद्रप्पा काळे (रा. माळीनगर), संतोष नागन्ना येणपे (रा. वाढेगाव), पांडूरंग मोहन शिणगारे (रा. देवकतेवाडी), नितीन नारायण पाटील (रा. मंगळवेढा), शिंगू धोंडीबा वाघमारे (रा. कचरेवाडी), भाग्यवंत किसन पौळ (रा. चिंचोली) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी २ लाख ७३ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या जुगार अड्ड्याच्या शेजारील खोलीत चालू असलेल्या अवैध दारू विक्री प्रकरणी विठ्ठल निवृत्ती जाधव याला अटक केली. त्याच्याकडील हातभट्टीची २०० लिटर दारू यावेळी जप्त करण्यात आली. या सर्व आरोपींविरोधात सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विरेश प्रभू सर यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील स.पो.नि संदिप धांडे, पोना अमृत खेडकर, अंकूश मोरे, पो.कॉ. अमोल माने, प्रविण पाटील, पांडूरंग केंद्रे, सुरेश लामजने, दिनेश राठोड, बालाजी नागरगोजे यांनी केली.
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा











