👁 12 Views

दहा लाखांच्या खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण

दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी तेलंगणाच्या सरकारी डॉक्टराचे अपहरण करणार्‍या दोन सख्ख्या भावांसह  चौघांना  सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. डॉक्टरचे अपहरण झाल्यापासून केवळ तीन तासांत आरोपींना पोलिसांना अटक करून डॉक्टरची सुटका केली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. दरम्यान, या अपहरणाचे तेलंगणा राज्यात तीव्र पडसाद उमटले असून, तेथील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी संपाचा इशारा दिला आहे. परंतु, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी काही तासांमध्ये आरोपींना अटक करून अपहृत डॉक्टरची सुटका केल्याने दोन्ही राज्यांतील संबंध सुधारण्यास फार मोठी मदत झाली आहे.
रामचंद्र महादेव कबाडे, पांडुरंग महादेव कबाडे (रा. एकतपूर, ता. सांगोला), कृष्णा विठोबा गडदे (रा. बेहरीचिंचोली, ता. सांगोला) आणि प्रकाश मधुकर खटके (रा. वासुद, ता. सांगोला) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. डॉ. के. तिरूपती (रा. तेलंगणा) असे अपहरण झालेल्याचे नाव असून, याबाबत सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळी कबाडे व त्याच्या चार साथीदारांनी भिगवण येथील अक्षय लॉजमधून डॉ. तिरुपती यांना बोलेरो गाडीत घालून त्यांचे अपहरण करून त्यांना एकतपूर येथे आणले होते. डॉ. तिरुपती यांना कबाडे यांच्या घरात डांबून ठेऊन त्यांच्या सुटकेसाठी 10 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याबाबत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयित आरोपी व अपहृत डॉ. तिरुपती यांची माहिती काढून सापळा लावून सांगोल एस.टी. स्टँड येथे सायंकाळी पैसे घेण्यासाठी आलेल्या आरोपींचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. पोलिसांना पाहून अपहरणकर्त्यांनी डॉ. तिरुपती यांना सोडून बोलेरो जीपमधून पळ काढला. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करुन वरील चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी वरील चौघा आरोपींसह जीपदेखील ताब्यात घेतली आहे. 
कबाडे व त्याच्या साथीदारांनी डॉ. तिरुपती यांचे पैशासाठीच अपहरण केल्याचे निष्पन्न झाले आहे. कबाडे याने डॉ. तिरुपती यांना भिगवण येथे नेले व तिथे लॉजमध्ये डॉ. तिरुपती यांचे विविध फोटो काढले. ते फोटो दाखवून कबाडे हा डॉ. तिरुपती यांना ब्लॅकमेल करीत होता. सकाळी लॉजमधून डॉ. तिरुपती यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना आरोपींकडून जबर मारहाण करण्यात आल्याचेही दिसून आले.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक बाबुराव म्हेत्रे, रियाज शेख, हवालदार नारायण गोलेकर, पोलिस शिपाई  विजय भरले, रवी माने, सचिन गायकवाड, सागर शिंदे, इस्माईल शेख यांनी केली.

  



















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

  

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *