👁 6 Views

निराधार वृध्देला दिला आधार

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 30 July 2017



विठ्ठलाच्या या पावन नगरीत अनेक श्रावणबाळ आपल्या माता-पित्यांना सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घडविण्यासाठी अगदी कावड करुन घेवुन येतात हेही दृश्य येथे पहावयास मिळते तर या पंढरीत भिक्षा मागणून आई वडील जगतील म्हणून येथे वृध्द माता पित्यांना सोडून जाणारे काही महाभागही आहेत.त्या मुळेच पंढरीतील विविध घाट आणि प्रमुख रस्त्यावर वृध्द भिक्षुुक मोठया प्रमाणात आढळून येतात.काही वेळा तर अगदी सुखवस्तू कुटुंबातील वृध्दांनाही पंढरीत आणून सोडले जात असल्याचे दिसून येते.असाच एक प्रकार नुकताच घडला असून येथील अंबाबाई स्टॉपवर एक वयोवृध्द निराधार आजी मनकरना विठ्ठल देशमुख कवठे जि.परभणी  विव्हळत बसली होती.तीची अवस्था पाहून विक्रम शिरसट मित्र मंडळाचे माउली अधटराव,अमर संगीतराव,किशोर दंदाडे,आनंद कोळी,पांडुरंग सावंतराव आदी कार्यकर्त्यांनी तीची विचारपूस केली असता ती निराधार व आजारी असल्याचे समजले.त्यावेळी या कार्यकर्त्यांनी तातडीने तिला उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्या वृध्देच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव पाहून सार्‍यांनाच गलबलून आले. या घटनेची माहीती मिळताच नगरसेवक विक्रम शिरसट यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेवुन त्या वयोवृध्द महीलेची विचारपूस केली व सदर महिला पुर्णपणे बरी होईपर्यत तीची देखभाल करण्याच्या सुचना कार्यकर्त्यांना दिल्या.




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *