👁 6 Views

महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने पंढरीत मंगळागौरीचा भव्य कार्यक्रम संपन्न

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 30 July 2017


पंढरपूर (प्रतिनिधी):- येथील महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने पंढरीत भव्य-दिव्य अशा मंगळागौरीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतीक परंपरेचे प्रतीक म्हणजेच येथे साजरे होणारे विविध सण-उत्सव. श्रावण महिना म्हणजेच सण आणि उत्सवाची पर्वणी. या काळात विविध सांस्कृतीक सणामधून समाजात चैतन्य व उत्साह भरण्याचे कार्य केले जाते. विविध कलागुणांना वाव मिळतो. असाच एक सण म्हणजे मंगळागौर! महर्षी वाल्मिकी संघ पंढरपूर यांचे वतीने व संघाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य संपत सर्जे यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य असा मंगळागौरीचा कार्यक्रम येथील अंबाबाई पटांगण येथे घेण्यात आला. यामध्ये महिलांनी झिम्मा, फुगडी खेळत मंगळागौरीची पारंपारीक गाणी गात संगीताच्या तालावर फेर धरला. यात घागर फुंकणे, सुप घेऊन नाचणे, लाटणे नाचवणे आदी पारंपारीक पध्दतीचे नृत्यांचा समावेश होता. ही परंपरा जोपासण्याचे काम आयोजक संपत सर्जे हे गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत.
समाजातील महिलांना एकत्र आणून जुन्या रुढी-परंपरांना जागृत ठेवून हा समृध्द वारसा पुढील पिढीकडे सुपूर्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आठ दिवस या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये होममिनीस्टर, संगीत खुर्ची, गाण्याच्या स्पर्धा आदी स्पर्धा भरविण्यात आल्या. सौ. स्वाती ननवरे व सौ. रेखा कोळी या दोन होममिनिस्टर स्पर्धेतील विजेत्या  सुवासिनींना पैठणी तसेच कु.सोनाली धनवडे व  कु. संचीता कोळी या दोन संगीत खुर्ची मधील विजेत्या मुलींना आकर्षक भेटवस्तु देण्यात आल्या. होममिनिस्टर स्पर्धेतील उपविजेत्या सौ.दमयंती सर्जे व सौ.प्रियंका साळुंखे या दोन सुवासिनींना सौभाग्याचं लेणं असणारे हळदीकुंकवाचे पंचपाळ भेट देण्यात आले.
सौ.रुक्मिणी तारापूरकर, सौ.अनिता वाघमारे, सौ.कविता सर्जे, सौ.भाग्यश्री कोळी, सौ.रेखा कोळी, सौ.कांचन माने, सौ.रेश्मा इंदापूरकर, सौ.वैशाली नायकुडे, सौ.स्वाती ननवरे, सौ.स्नेहा ननवरे, सौ.सोनाली धनवडे, सौ.वैशाली पुजारी (मामी), सौ.सुप्रिया अभंगराव, सौ.ताई वाघमारे, सौ.निर्मला शिरसट, सौ.सोनाली अभंगराव, सौ.नेहतराव, सौ.परचंडे, सौ.अधटराव, सौ.संगीतराव, सौ.अंकुशराव, कु.मयुरी सर्जे, कु.सिध्दी सर्जे, कु.दुर्गा ननवरे, कु.वैष्णवी माने व अनेक महिला व मुलींनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उत्साहात सहभाग घेतला होता. 




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *