👁 11 Views

‘सैराट’ सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा आज वाढदिवस.. विशेष लेख

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 24 August 2017 


     ‘सैराट’ सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा आज वाढदिवस..
     नागराज मंजुळे जन्म. २४ ऑगस्ट १९७७ . त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊर येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात शिकायला आले. मराठी विषयात एम.ए. करताना केशवसुत, मर्ढेकर, अरूण कोल्हटकर, नामदेव ढसाळ नव्याने भेटत गेले. अधिक जवळचे वाटत गेले. एम.फिल करत चित्रपटाचे विचार डोक्यात घट्ट बसलेले होते. नागराज मंजुळे हे ‘पिस्तुल्या’ आणि त्यानंतर आलेल्या ‘फँड्री’ या सिनेमापासून प्रसिद्धीझोतात आले. नागराज यांच्या पिस्तुल्या या शॉर्टफिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळालं व फॅन्ड्री या सिनेमाला राष्ट्रीय आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. श्याम बेनेगल,बुध्द्देव दासगुप्ता, जब्बार पटेल, दीपा मेहता,अंजुम राजबली आणि अनेकांनी नागराज यांच्या फिल्मचं कौतुक केलं आहे.
     

    ‘सैराट’ या सिनेमाने १००  कोटींच्या घरात तिकिटबारीवर गल्ला जमवला. व नागराज यांनी मराठी सिनेसृष्टीत इतिहास रचला. एवढा व्यवसाय करणारा ‘सैराट’ हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. 
    आता नागराज मंजुळे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना घेऊन एका हिंदी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. अद्याप त्यांच्या हिंदी चित्रपटाचे नाव फायनल झालेले नाही. 
    नागराज मंजुळे यांना पंढरपूर लाईव्ह परिवाराचे वतीने  वाढदिवसाच्या शुभेच्छा!

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *