👁 11 Views

कधी आणावे घरी बाप्पाला..? कशी करावी प्राणप्रतिष्ठा..? बघा श्री गणेशोत्सव विशेष..

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 24 August 2017 

    🚩🕉🚩🕉🚩🕉🚩🕉🚩🕉


    श्री. गणपती घरी आणण्याचे मुहूर्त:-


    दि २४/०८/२०१७ रोजी गुरूवार भाद्रपद शुक्ल तृतीया आहे या दिवशी दुपारी ०१:५७ वाजता बलवान हस्त नक्षत्र सुरू होत आहे तर आपण या शुभ मुहूर्तावर व नक्षत्रावर श्री गणपतींची मुर्ती आणावी. 


    श्रीबाप्पा ला आणण्याचे मुहूर्त 


    *अमृत मुहूर्त :-* दु.०२:०० ते दु.०३:३०
    *शुभ मुहूर्त :-* सायं.०५:०० ते सायं.०६:३०
    *अमृत मुहूर्त :-* रात्री.०६:३० ते रात्री०८:००


    या विशेष मुहूर्तावर श्री गणपती आपल्या घरी घेऊन यावे ही विनंती…


    *श्री गणपती स्थापना मुहूर्त :*


    दि. २५-०८-१७ रोजी  गणेश चतुर्थी आहे. 
    सूर्योदया  पासून ते  संध्याकाळी ८:२९ पर्यंत गणपती स्थापना करू शकता.


    दिनांक २५-०८-२०१७ ला चतुर्थी तिथि रात्री ०८:२९ पर्यंत आहे.


    भद्रा प्रारंभ  शुक्रवार दि. २५-०८-२०१७ ला सकाळी  ०८:२६ ते रात्री ८:२९ पर्यंत  भद्रा आहेत. श्री.गणेशस्थापनेसाठी भद्रेचा निषेध नाही. त्यामुळे भद्रा काळात  गणपती  स्थापना करण्यास काहीही हरकत नाही.


    तसेच दि. २५-०८-२०१७ ला  राहू काळ शुक्रवारी सकाळी १०:३० ते  १२:०० पर्यंत आहे.


    त्यामुळे गणपती स्थापना दि. २५-०८-११७ रोजी  सूर्योदयापासून  ते  रात्री ०८:२९ पर्यंत  गणपती स्थापना आपल्या कुलाचारा प्रमाणे करावी. ( गणपती स्थापना करण्याकरीता  भद्रा निषेध समजल्या जातात त्यामुळे राहूकाळ व भद्रा काळात गणपती स्थापना करण्यास काही हरकत नाही.  )


    गणेशचतुर्थीला चंद्र पाहू नये. पाहिल्यास खोटे आळ येतात. चुकून चंद्रदर्शन झाल्यास मंत्र:- सिंह प्रसेनवमधीत्सिहो जम्बवताहत l सुकुमारक मा रोदिस्तव ह्रयौष्न स्यम्नतक ll
    या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.


    *गणपतीची मुर्ती कशी असावी* 


    १) गणपती १ फुटांपेक्षा जास्त मोठी मुर्ती नसावी,


    २) मुर्ती एका व्यक्तीला सहज उचलुन नेता व आणता आली पाहिजे,


    ३) सिंहासनावर किंवा लोडाला टेकुन बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम.


    ४) साप, गरुड, मासा, किंवा युद्ध करतांना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये, 


    ५) शिवपार्वती च्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये, कारण शिव पार्वती ची पुजा लिंगस्वरुपातच केली जाते शास्त्रात मुर्ती निषिद्ध आहे,


    ६) गणेश मुर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणूनये, 


    ७) गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मुर्ती मधे देवत्व येत नाही, तोवर ती केवळ माती समजावी.
    विधीवत प्राणप्रतिष्ठापना करावी,


    ८) मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मुर्ति भंग झाल्यास अजिबात घाबरू नये, त्या मुर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरीत विसर्जन करावे, व दुसरी मुर्ती आणुन प्रतिष्ठापना करावी, मनात कोणतेही भय व शंका आणु नये.


    ९) कुटुंबात किंवा नात्यात मृत्यु झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी, शेजारी, मित्रमंडळी यांचे करावी. पुजा नैवेद्य दाखवून गणपती विसर्जन करून घ्यावे, एखाद्या वर्षी उत्सवातचे दिवस कमी झालेले चालतील.


    १०) घरामध्ये गर्भवती स्त्री असता गणेश मूर्तीचे विसर्जन करता येते. अशा वेळेस मूर्ति विसर्जन न करण्याची रुढी गैरसमजुतीमुळे आहे. गर्भवती महिला घरात असता भाद्रपद शु. चतुर्थीस  बसवलेला गणपति विसर्जन न करण्याची काही ठिकाणी रुढ आहे ती शास्त्र संम्मत नाही . चतुर्थीला बसवलेला गणपति आपल्या कुलाचारा प्रमाणे ठरवलेल्या दिवशी विसर्जन करावा, वर्षभर तसाच ठेवु नये .    


    ११) गणपती ला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो, केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत, दही+साखर+भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे.
    जय गणेश..! सर्वांना पंढरपूर लाईव्ह परिवाराचे वतीने गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *