👁 10 Views

पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या विशेष टीमचा मंगळवेढ्यातील जुगार अड्ड्यावर छापा..2 लाख 7 हजारांच्या मुद्देमालसह 9 आरोपी ताब्यात

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 24 August 2017 


    सोलापूर – मा.पोलीस अधीक्षक श्री.विरेश प्रभू सर यांचेकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दि 24-8-2017 रोजी पहाटे 03-00 वा चे सुमारास मंगळवेढा शहरातील राजलक्ष्मी धाब्याचे पाठीमागे असलेल्या आण्णा चेळेकर यांच्या मालकीच्या शेतामधील पञाशेडचे बाजूला चंद्रकांत दोलतोडे हा चालवत असलेल्या मन्ना नावाच्या जुगार आड्यावर छापा टाकून आरोपी 1) विकास दत्ताञय अवताडे, 2) राहुल सुभाष वाघमारे, 3) सागर कुमार कोष्टे, 4) बंडू मोहन सरकाळे, 5) अक्षय महादेव कोळी, 6) आयान ईलाई काझी, 7) दादा सोपान जगताप, 8) श्रीकांत बाळासाहेब इंगळे, 9) संदेश बाळू बुधवंतराव, सर्व रा. मंगळवेढा यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुमारे 2,07,820 रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सदर जुगार आड्डयावरून दोन इसम 10) युवराज इरकर व 11) चंद्रकांत शिवाजी दोलतोडे दोघे रा. मंगळवेढा हे पळून गेले आहेत. तसेच आड्ड्याच्या मालकाबाबत व जागा मालकाबाबत चौकशी केली असता त्यांची नावे चंद्रकांत दोलतोडे व 12) आण्णा चेळेकर असे असल्याचे सांगीतल्याने सर्व 12 आरोपी विरूध्द मंगळवेढा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

              सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री विरेश प्रभू सर यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील स.पो.नि संदिप धांडे, पो.ना अमृत खेडकर, पो.कॉ प्रविण पाटील, दिनेश राठोड, बाळराजे घाडगे, पांडूरंग केंद्रे, अमोल माने, श्रीकांत जवळगे, सोमनाथ बोराटे, बालाजी नागरगोजे यांच्या  टिमने हे काम केले आहे.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *