👁 10 Views

संशोधनासाठी कार्यशाळेची गरज – अनिरुद्ध कुलकर्णी

Pandharpur Live : 
स्वेरीमध्ये एस.टी.टी.पी. कार्यशाळेचे उदघाटन
पंढरपूर– ‘आपल्या दैनंदिन जीवनात अँटिना आणि त्याच्याशी संबंधित विविध विभाग हे खूप महत्वाचे असून या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या अद्ययावत सुविधामध्ये काम करावे लागते. अँटेना प्रोजेक्टमध्ये सध्या काम युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रीय कार्य संशोधन अंतर्गत अँटिना या क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्यांची संख्या मात्र खूप कमी आहे. या तुलनेत कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पंढरपूरमध्ये चालू असणारे या क्षेत्रातील संशोधन संबंधी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या कार्यशाळा माध्यमांतील सुविधांचा वापर करून भविष्यात अँटेना क्षेत्रात उत्तम संशोधन कार्य करता येवू शकते म्हणून संशोधनासाठी कार्यशाळेची गरज असते. ’असे प्रतिपादन पुण्यातील आर. एफ. सोल्युशन्सचे रेडीओ फ्रिक्वेन्सी (आर.एफ.) डीझाईन इंजिनिअर अनिरुद्ध कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
         गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात आयोजिलेल्या आणि आठवडाभर चालणाऱ्या ‘शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम (एस.टी. टी.पी.)’ च्या उदघाटन प्रसंगी अभियंता अनिरुद्ध कुलकर्णी उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. प्रास्तविकात कार्यशाळेचे समन्वयक प्रा. महेश मठपती यांनी एस. टी. टी. पी. कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देवून ही कार्यशाळा आयोजिन्याचा हेतू सांगितला. ए. आय. सी. टी. ई. कडून मॉडरॉब अंतर्गत मिळालेल्या निधीतून स्वेरी इंजिनीअरींगच्या ई.अँड टी.सी. विभागाने मायक्रोवेव लॅब अद्ययावत करण्यात आली आहे.त्याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना व संशोधकांना व्हावा ह्या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पुढे बोलताना अभियंता कुलकर्णी यांनी उपलब्ध असणाऱ्या सुविधा वेक्‍टर नेटवर्क अॅनालायझर (२० गिगा हर्ट्झ क्षमतेचे), कॅड फेको सॉफ्टवेअर आणि पीसीबी प्रोटोटाइप मशीन याबाबत माहीती दिली. शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांनी संशोधन क्षेत्रातील होत असलेली प्रगती बाबत मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा आठवडाभर चालणार असून इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील नामवंत संशोधक मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी  संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. पाटील, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे पदवी व पदविकेचे विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. नीता कुलकर्णी यांनी केले तर आभार इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते यांनी मानले.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *