👁 12 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये “रिसेन्ट ट्रेन्ड्स इन हिट एक्सचेंजर” विषयावर कार्यशाळा

Pandharpur Live : 
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात “रिसेन्ट ट्रेन्ड्स इन हिट एक्सचेंजर” या विषयावर एक आठवडा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
     या कार्यशाळेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डाॅ. एन. के. साने, डाॅ. श्याम कुलकर्णी, डाॅ. रविंद्र व्यवहारे, डाॅ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. नंदकिशोर फुले, प्रा. बाळासाहेब गंधारे आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
     यावेळी प्रमुख पाहुणे डाॅ. एन. के. साने सह सर्व मान्यवरांचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
     या कार्यशाळेत डाॅ. एन. के. साने, डाॅ. चिञकार, डाॅ. एस. एन. कुलकर्णी, डाॅ. ए. बी. शिंदे, डाॅ. सोनगे आदींनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. या दरम्यान पंढरपूर येथील इसबावी येथील दुधपंढरी दुध संकलन केंद्रा भेट देऊन तेथील वेगवेगळ्या पद्धतीचे हिट एक्सचेंजर पाहणी करून माहिती घेण्यात आली.
    ही कार्यशाळा डाॅ. श्याम कुलकर्णी, प्रा. नंदकिशोर फुले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली असुन ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
या कार्यशाळेचे सुञसंचालन प्रा. ॠषिकेश कुलकर्णी व प्रा. महेश जोशी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. बाळासाहेब गंधारे यांनी मानले.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *