👁 11 Views

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी येथील संजीवन समाधीवरची महापुजा होणार बंद

Pandharpur Live : 
आळंदी देवाची- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी येथील संजीवन समाधीवर भाविकांकडून करण्यात येणारी महापूजा बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी-देवस्थानने घेतला आहे. समाधीऐवजी चलपादुकांची महापूजा करण्यात येणार आहे. मुक्ताई मंडपात चलपादुका ठेवून, त्या ठिकाणी भाविकांना महापूजा करता येणार आहे. 

चलपादुका महापूजेबाबत नियमावली करण्यात येणार असून, ३१ जानेवारीपर्यंत भाविक, वारकरी, आळंदी ग्रामस्थ, नागरिक व संबंधित घटकांकडून सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानुसार नियमावली तयार केली जाणार आहे. भाविकांच्या महापूजेसंदर्भात देवस्थान कमिटी आणि संबंधित घटक यांच्यात बैठक झाली. यात देवस्थानने हा निर्णय घेतला असून, ब्रह्मवृंद व इतर संबंधित घटकांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. यामुळे आगामी काळात निर्णय वादग्रस्त ठरणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

याबाबत माहिती देण्यासाठी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील म्हणाले, ‘पुरातत्त्व विभागाने दिलेल्या अहवालात महापूजेमुळे समाधीची झीज होत असल्याचे सांगितले आहे. महापूजा चालू असताना दर्शन बारीतून येणाऱ्या भाविकांना समाधी गाभारा अरुंद असल्याने गैरसोय सहन करावी लागत होती. याबाबत अनेक महिने अभ्यास चालू होता. चार भाविकांसाठी ४०० जणांना वेठीस धरणे योग्य नाही.’ समाधीचा ठेवा चिरंतन आहे. त्याची जपणूक व्हावी हा उदात्त हेतू आहे, त्याला सर्वांनी साथ द्यावी, अशी अपेक्षा असल्याचेही ढगे पाटील यांनी सांगितले. 

विश्वस्त डॉ. अभय टिळक, डॉ. अजित कुलकर्णी यांनीदेखील आपली भूमिका मांडताना सांगितले, की गेली अनेक वर्षे या निर्णयाबाबत चर्चा सुरू आहे. सर्व सहमतीने निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. २०१७ पासून यावर चर्चा सुरू आहे. तीन वेळा याबाबत बैठका झाल्या आहेत. शेवटी समाधीवर होत असलेल्या महापूजा व समाधीचे पावित्र्य याचाही संबंध आहे. संजीवन असलेल्या माऊलींच्या समाधीवर दोन मिनिटांत पाणी घालून जाणे योग्य आहे का? शेवटी किती वेळा महापूजा करायची, यालाही मर्यादा आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पादुकांची महापूजा केली जावी, असा निर्णय घेतला आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *