👁 6 Views

नगरसेविका सौ.अर्चना नवनाथ रानगट यांचा स्तुत्य उपक्रम… प्रभाग क्रमांक 14 मधील गोरगरीब मजुर कुटुंबांना जीवनावश्यक वस्तु व अन्नधान्याचे वाटप

पंढरपूर (प्रतिनिधी):- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सर्वसामाान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते व समाजसेवकांकडून होताना आढळत आहे. पंढरीतही अनेक नगरसेवक आपापल्या प्रभागातुन जंतुनाशक फवारणी करताना आढळत आहेत. परंतु प्रभाग क्रमांक 14 च्या नगरसेविका सौ. अर्चना नवनाथ रानगट यांनी याच्याही पुढे एक पाऊल टाकुन आपल्या प्रभागातील मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणार्‍या गोरगरीब कुटुंबाला स्वखर्चाने जीवनावश्यक वस्तु व अन्नधान्याचा पुरवठा करुन मोठा दिलासा दिला आहे.

प्रभागातील प्रत्येक कुटुंबास 5 किलो गहु, 5 किलो ज्वारी,  2 किलो तांदुळ, 1 किलो साखर व 1 तेल पिशवी अशा प्रकारचा अत्यावश्यक वस्तु व अन्नधान्याचा पुरवठा घरपोहोच करण्यात आला. आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली व समाजसेवक नवनाथ रखमाजी रानगट यांच्या संकल्पनेतुन हा उपक्रम राबविला आहे. प्रभागामध्ये सर्वत्र जंतुनाशक फवारणी केल्यानंतर आमच्या प्रभागात अनेक मजुरीवर उदरनिर्वाह करणारे कुटुंब वास्तव्यास असल्याने त्यांच्या पोटापाण्याचे काय? हा प्रश्‍न सतावत होता. त्यामुळे यांना शासनाची मदत मिळेपर्यंत आपणच अशा सर्व कुटुंबांना मदत करायची हा निर्णय घेतला व त्यानुसार स्वखर्चाने प्रभागातील 130 कुटुंबांना वरीलप्रमाणे शिधा वाटप केले. अशी माहिती पंढरपूर लाईव्हशी बोलताना नगरसेविका सौ. अर्चना नवनाथ रानगट यांनी दिली.

सोशल डिस्टींग्शन ठेवाआमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभागात वस्तुंचे वाटप करताना नागरिकांना सोशल डिस्टींग्शनचे पालन करा. आपल्या घरातच रहा. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करा. संचारबंदीच्या कालावधीत घराबाहेर पडु नका. असे आवाहन प्रभागातील नागरिकांना केले असल्याची माहिती नगरसेविका सौ. सौ.अर्चना नवनाथ रानगट  यांनी दिली.


कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रभावामुळे संपुर्ण जग भीतीच्या सावटाखाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरावरुन प्रयत्न होत आहेत. भारतात व महाराष्ट्रातही कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु या कालावधीत मात्र हातावर पोट असलेल्या सर्वसामन्य गोरगरीबांचं जगणं मात्र मुश्किलीचं झालं आहे. अशा कुटुंबाना शासनाकडून मदत देण्याची घोषणा सुरु झालेली आहे. परंतु ही मदत मिळेपर्यंत गोरगरीबांनी जगायचं कसं? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या परिस्थितीत नगरसेविका सौ. अर्चना नवनाथ रानगट यांनी आपल्या प्रभागात राबविलेला हा उपक्रम निश्‍चितच कौतुकास्पद व स्तुत्य आहे. नगरसेविका साौ. रानगट यांच्या या कार्याबाबत परिसरातुन समाधान व्यक्त होत आहे.

प्रभागात अन्नधान्य व जीवनावशयक वाटप करण्यासाठी शुभम रानगट, प्रफुल्ल रानगट सौरभ पाटोळे, खंडु रानगट, अक्षय शिंदे, पप्पुु रानगट, गणेश घोडके, संतोष वाघमारे, हनुमंत देवकर, बालाजी घोकडे, प्रितम रानगट, सौरभ चौगुले, अक्षय रानगट, सुजल रानगट, नागनाथ पाटोळे, आदींनी परिश्रम घेतले. 

प्रभाग क्र. 14 मध्ये सर्व्हे केला….
आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या सुचनेनुसार कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर प्रभाग क्रमांक 14 मधील रहिवाशांपैकी कोणी पुणे-मुंबई अथवा बाहेरच्या शहरातुन आलेले आहेत का याचा सर्व्हे केला आहे. व त्यानुसार पंढरपूर नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांसह प्रभागात फिरुन माहिती संकलीत केली आहे. अशी माहितीही नगरसेविका सौ. रानगट यांनी दिली.  


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *