👁 8 Views

आता सोलापूर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी डॉ. जितेंद्र सतिश आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. यापुर्वी 8 आणि 15 जानेवारी रोजी राज्यातील जिल्हयांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.

राज्य शासनाने आज (31 मार्च) रोजी काढलेल्या आदेशाप्रमाणे मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची सोलापूर जिल्हयाच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 8 जानेवारी रोजी काढलेल्या आदेशामध्ये अंशतः बदल करून डॉ. आव्हाड यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शरद पवार यांना निवेदन पाठवून पालकमंत्री बदलावा अशी मागणी केली होती. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांची सोलापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड तत्काळ सोलापुरात यावे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त यांच्यासोबत बैठक घ्यावी. गोरगरीबांसाठी धान्य वाटप सुरू करावे, अशी मागणी नगरसेविका फुलारे यांनी केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *