👁 7 Views

पंढरीत परराज्यातील कामगारांना मनिषा नगर गृहनिर्माण संस्थेकडून शिधा वाटप

Pandharpur Live- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पंढरीत अडकुन पडलेल्या परराज्यातील कामगारांना आज मनिषा नगर गृहनिर्माण संस्थेकडून जीवनावश्यक  वस्तुंचे वाटप करण्यात आले. पंढरपूर येथील संत केंद्रे महाराज धर्मशाळेमध्ये कर्नाटक तामिळनाडू व आंध्र प्रदेशातील काही कामगार म्हणजेच आता साधारणतः सहाशे ते सातशे कामगारांना तेथे दररोज प्रशासनाकडून म्हणजेच उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाकडून जेवण दिले जाते.

यासाठी माननीय उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत आज मनीषा नगर गृहनिर्माण संस्थेतर्फे ह्या लोकांना एक दिवसाचे जेवण देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आज आम्ही आमच्या कॉलनीतील काही सदस्यांनी जाऊन आजच्या जेवणाची शिधा त्यांना पोहोच केली. अशी माहिती पत्रकार उत्तम अभंगराव, नगरपरिषदेचे पाणीपुरवठा समिती सभापती संग्राम अभ्यंकर, माजी नगरसेवक संजय अभ्यंकर, मनिषा नगर गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन अमोल नागटिळक, सचिव आवताडे सर आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *