>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
पंढरपूर तालुक्यातील कासेगांव, खर्डी, भाळवणी, चळे, पुळुज, भंडीशेगांव या सर्कलमध्ये खुप मोठ्या प्रमाणात वादळीवा-यांसह अतिवृष्टी झाल्याने शेतक-यांच्या पिकांचे व नागरिकांच्या घरांचे पडझड होवून पत्रे उडुन गेलेली आहेत. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरांच्या भिंती पडल्या आहेत व काही ठिकाणी शेतक-यांची जनावरही वीज कोसळल्यामुळे मरण पावली आहेत. तसेच गेली तीन दिवस अतिवृष्टीमुळे नदीवरील, ओढ्यावरील पुल पाण्यामुळे वाहुन गेल्याने काही गावांचा संपर्कही तुटला आहे.
तसेच मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे खरीप पिकांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे कोविड-१९ या जागतिक महामारीच्या रोगामुळे शेतक-यांच्या पिकांना कवडीमोलाचा भाव मिळत आहे. यामध्ये देखील निसर्गाने घात केल्याने शेतकèयांचे जीवन विस्कळीत झाले. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय सीएलएस- २०१९/प्र.क्र.१७७/म-३ दि.११/९/२०२० नुसार अतिवृष्टी व पूरामुळे शेतपीकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतक-यांना अनुज्ञेय असलेल्या मदती दराच्या तिप्पट दराने येणारी रक्कम मदत म्हणून देण्यास मान्यता देणेत आली आहे. या पाश्र्वभूमीवर त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी याबाबत आ.प्रशांत परिचारक यांनी संबंधितांशी संपर्क साधला आहे.
पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी


